घोडबंदर रोड येथील एस.जी इंग्रजी शाळा दुरावस्थेच्या विळख्यात मान्यता रद्द करा अन्यथा आंदोलन छेडणार : मनसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 04:27 PM2018-12-01T16:27:57+5:302018-12-01T16:32:05+5:30

घोडबंदर रोड येथील एस.जी. इंग्रजी शाळा दुरावस्थेच्या विळख्यात अडकली आहे असा आरोप मनविसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी केला आहे.

 SG English School at Ghodbunder Road, abolish the unauthorized identity of the school, otherwise the movement will be launched: MNS | घोडबंदर रोड येथील एस.जी इंग्रजी शाळा दुरावस्थेच्या विळख्यात मान्यता रद्द करा अन्यथा आंदोलन छेडणार : मनसे

घोडबंदर रोड येथील एस.जी इंग्रजी शाळा दुरावस्थेच्या विळख्यात मान्यता रद्द करा अन्यथा आंदोलन छेडणार : मनसे

googlenewsNext
ठळक मुद्दे एस.जी इंग्रजी शाळा दुरावस्थेच्या विळख्यात शाळेची मान्यता रद्द करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन मनसेने केलेले आरोप चुकीचे


ठाणे : घोडबंदर रोड येथील एस.जी. इंग्रजी शाळा ही गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेच्या विळख्यात अडकली आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असून या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या शाळेची मान्यता रद्द करावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसेने दिला आहे. मात्र, मनसेने केलेले आरोप चुकीचे असल्याचे शाळेने म्हटले आहे.
एस.जी इंग्लिश स्कुल या शाळेतील पत्र्याच्या भिंती, दरवाजे नसलेले शौचालय, तोडकी-मोडकी बैठक व्यवस्था, शाळेतील कर्मचारयांचे थकीत मानधन अशा सर्व गोष्टींकडे डोळेझाक करु न प्रशासन येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात आणत आहेत. अशा खाजगी शाळांना मान्यता कशी मिळते असा सवाल मनविसेचे ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी केला आहे. मागील काही महिन्यामध्ये महाविद्यालयांमधील सुविधांच्या अभावामुळे कारावाईचा बडगा उचलणारे पालिका आणि िजिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग भरमसाठ फी घेणाºया व मुलभूत सुविधाही न देणाºया एस.जी इंग्लिश स्कुलकडे कानाडोळा करत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. या शाळेमध्ये शिकविणाºया शिक्षकांना किमान वेतन आयोगाप्रमाणे थिकत मानधन द्यावे व विद्यार्थ्यांना शिक्षण्यायोग्य व्यवस्था करावी अन्यथा या शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हा परिषद आणि ठामपा शिक्षण विभागाकडे केली आहे.
यावेळी मनविसे उपशहर अध्यक्ष दिपक जाधव, प्रमोद पताडे, संदीप चव्हाण, शहर सचिव सचिन सरोदे, विभाग अध्यक्ष विजय दिघे, राकेश आंग्रे, विवेक भंडारे, उपविभाग अध्यक्ष हेमंत मोरे, तन्मय नाईक व इतर पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.
-----------------------------------
या शाळेची नविन इमारत तयार झाली की शाळा त्या इमारतीत स्थलांतरीत केली जाईल. सध्याच्या ठिकाणी आम्ही फक्त काही महिनेच आहोत. परंतू विद्यार्थ्यांना सर्व सुविधा चांगल्या दिल्या जात आहेत. तसेच, शिक्षकांना वेतनही वेळेत आणि योग्य दिले जात आहे. सध्या शाळा असलेली जागा आम्हाला बिल्डरने दिली आहे.
- मीनाक्षी दुबे, मुख्याध्यापीका, एस.जी इंग्लिश स्कुल
*गेल्या सात वर्षांपासून शाळा दुरावस्थेतच आहे. या शाळेबद्दल पालकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या तेव्हा ही शाळा या परिसरात असल्याचे माहित पडले.
- किरण पाटील, मनविसे
 

Web Title:  SG English School at Ghodbunder Road, abolish the unauthorized identity of the school, otherwise the movement will be launched: MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.