शहाड उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:44 PM2018-08-23T23:44:01+5:302018-08-23T23:44:35+5:30

शाळेच्या स्कूलबस, व्हॅन, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच अन्य प्रवासी अडकून पडल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.

Shahad flyover transporters | शहाड उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

शहाड उड्डाणपुलावर वाहतूककोंडी

Next

म्हारळ : कल्याण-मुरबाड मार्गावरील शहाड उड्डाणपुलावर पडलेले खड्डे आणि बेशिस्त वाहनचालकांनी ओव्हरटेकिंगचा केलेला प्रयत्न, यामुळे गुरुवारी मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. त्यात शाळेच्या स्कूलबस, व्हॅन, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा तसेच अन्य प्रवासी अडकून पडल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.
कल्याणहून मुरबाड तर, पुढे नगरकडे तसेच उल्हासनगर येथे जाण्यासाठी शहाड येथील उड्डाणपूल ओलांडावा लागतो. उल्हासनगरला जाणाºया वाहनचालकांना पुलावरून उतरल्यानंतर पुलाखाली ‘यू’ टर्न घ्यावा लागतो. तर, उल्हासनगरहून कल्याणला जाणाºया वाहनांनाही पुलाखालून आल्यानंतर ‘यू’टर्न घेऊन पुलावर चढावे लागते. कल्याण-मुरबाडदरम्यान येजा करणारी वाहने सरळ येतात. मात्र, उल्हासनगरला येजा करणारे सिमेंट मिक्सर, डम्पर यासारख्या अवजड वाहनांना वळण घेणे अवघड होते. त्यातच, बेशिस्त दुचाकीस्वार, रिक्षाचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवतात. अनेकदा ही वाहने ओव्हरटेकिंगचा प्रयत्न करतात. शिवाय, विरुद्ध दिशेनेही वाहने येतात. ही कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ येते.
कोंडीचा सर्वाधिक फटका शहाड, बिर्लागेट, म्हारळ रोडवरील शाळांतील विद्यार्थ्यांना बसतो. स्कूलबस, व्हॅन, रिक्षा त्यात तासन्तास अडकून पडतात. परिणामी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात. भूकतहान लागल्यामुळे अनेकदा विद्यार्थी रडकुंडीला येतात. लघुशंकेमुळेही ते त्रासून जातात. कल्याण-मुरबाड-नगर या लांब पल्ल्याच्या एसटी, खाजगी जीपमध्येही प्रवासी अडकून पडतात. नोकरी, व्यवसायानिमित्ताने या रस्त्याने येजा करणाºयांनाही अनेकदा लेटमार्कला सामोरे जावे लागते.
कल्याण पूर्वेतील गुरुकुल शाळेची बस गुरुवारी उल्हासनगर, शहाड पूलमार्गे कल्याणला दोन तासांनी आल्याचे चालक किशोर माळी यांनी सांगितले. पश्चिमेला जोडणाºया तीनही पुलांवर झालेल्या कोंडीमुळे आमचे हाल झाल्याचे माळी म्हणाले.

शहाड उड्डाणपुलावर वाहनांच्या एका रांगेऐवजी पाचपाच रांगा लागत आहेत. तसेच पुलावरील खड्डे आणि ओव्हरटेकिंगमुळे कोंडी होत आहे.
- कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगर

अन्य परिसरातही रांगा
बाईच्या पुतळ्याजवळील उड्डाणपुलावरही गुरु वारी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. तेथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुलापासून सिंडिकेटपर्यंतचा रस्ताही जॅम झाला होता.

Web Title: Shahad flyover transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.