दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शहापूरच्या भूमी अभिलेख लिपिकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:44+5:302021-07-28T04:42:44+5:30

ठाणे : जमिनीच्या मोजणीमध्ये आलेला तीन गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करून दोन हजारांची ...

Shahapur land records clerk arrested for accepting bribe of Rs 2,000 | दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शहापूरच्या भूमी अभिलेख लिपिकास अटक

दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शहापूरच्या भूमी अभिलेख लिपिकास अटक

Next

ठाणे : जमिनीच्या मोजणीमध्ये आलेला तीन गुंठे फरकाचा पंचनामा करून देण्यासाठी पाच हजारांच्या लाचेची मागणी करून दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या शहापूर येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपिक पंडित गोखणे (५२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी अटक केली. त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

शहापूर येथील ६० वर्षीय तक्रारदाराची कवडास येथे जमीन आहे. या जमिनीची कागदोपत्री मोजणी केली होती. मात्र, मशिनने केलेल्या मोजणीपेक्षा पेपरच्या मोजणीतील जमीन तीन गुंठे अधिक वाढल्याचे निदर्शनास आले होते. जमीन वाढल्याचा पंचनामा करून देण्यासाठी शहापूरच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयातील लिपिक गोखणे यांनी पाच हजारांच्या लाचेची मागणी २२ जून रोजी केली होती. तडजोडीनंतर दोन हजारांची रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान, यासंदर्भात संबंधित तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना गोखणे याला एसीबीच्या पथकाने २६ जुलै रोजी दुपारी रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shahapur land records clerk arrested for accepting bribe of Rs 2,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.