शहापूर नगरपंचायतीला ११ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:29 PM2020-02-26T22:29:27+5:302020-02-26T22:29:30+5:30
पथदिव्यांसाठी खोदले रस्ते; सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवली नोटीस
आसनगाव : शहापूर नगरपंचायतीचे पथदिवे बसवण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र मांक १ शहापूरकडून रस्त्याचे नुकसान केल्याने शहापूर नगरपंचायतीला तातडीने दहा लाख ९२ हजार रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे.
शहापूर नगरपंचायत हद्दीतील जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील अंबिका माता मंदिर ते भारंगी नदीदरम्यान रस्त्याच्या उजव्या बाजूस पथदिवे टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याची डांबरी बाजूपट्टी खोदून काँक्रिट रस्त्याचे नुकसान केले आहे. त्यामध्ये खोदलेली माती भरण्यात आली आहे.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्याची देखभाल-दुरु स्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची
आहे.
त्यामुळे बाजूपट्टी पूर्ववत करण्यासाठी आणि कर्ब काढलेल्या ठिकाणी नवीन कर्ब टाकण्यासाठी येणारा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भरण्यात यावा, असे पत्र उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र .१ शहापूर यांनी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना पाठवून रक्कम तातडीने रकम भरण्यास सांगितले आहे.
ज्या कामासाठी डांबरी बाजूपट्टी आणि काँक्रि ट रस्त्याचे पृष्ठभागाचे खोदकाम करण्यात आले आहे. नुकसान झालेला रस्ता पुनर्स्थापित करण्याबाबत ठेकेदाराला सूचना दिलेल्या आहेत. नगरपंचायत ते पुन्हा व्यवस्थित करून देईल.
- बी. डी. परदेशी, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत, शहापूर