प्रश्न मांडूनही शहापूर तालुका मागास; आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मतदारसंघाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:36 AM2019-09-11T00:36:27+5:302019-09-11T00:36:51+5:30

आज तालुक्यात पाण्याची समस्या कायम आहे. ती सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात.

Shahapur taluka backward without question; A review of the constituency of MLA Pandurang Barora | प्रश्न मांडूनही शहापूर तालुका मागास; आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मतदारसंघाचा आढावा

प्रश्न मांडूनही शहापूर तालुका मागास; आमदार पांडुरंग बरोरा यांच्या मतदारसंघाचा आढावा

googlenewsNext

ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा असा शहापूर विधानसभा मतदारसंघ. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून पांडुरंग बरोरा हे निवडून आले. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या काळात अनेक प्रश्न विधिमंडळात मांडून सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही आज शहापूर तालुक्याचे चित्र भयावह आहे.

आमदार : पांडुरंग बरोरा, राष्ट्रवादी
मतदारसंघ : शहापूर

TOP 5 वचनं

  • तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविणे
  • बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे
  • प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडवणे
  • डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडविणे
  • गावागावात रस्ते करणे


त्यांना काय वाटतं?
गेल्या पाच वर्षात तालुक्यातील अनेक प्रश्न मी विधिमंडळात मांडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने मागणी करत आलो. मात्र सत्ता नसल्याने व विरोधी पक्षाचा आमदार असल्याने तो उपलब्ध झाला नाही .त्यामुळे अनेक विकासकांना खीळ बसली. तालुक्यातील पाणीप्रश्न कायम असून टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. गावागावातील रस्ते आजही हवे तसे पाहायला मिळत नाहीत.
- पांडुरंग बरोरा, आमदार

वचनांचं काय झालं?

  • पाणीटंचाई आजही कायम
  • बेरोजगारीचा प्रश्न प्रलंबित
  • रस्त्यांची अवस्था बिकट
  • बिगर आदिवासींचा प्रश्न
  • डम्पिंगचा प्रश्न सुटलेला नाही


पाण्याची समस्या
आज तालुक्यात पाण्याची समस्या कायम आहे. ती सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही. तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येतात. हा काही त्यावरील उपाय नाही. ती कायमची सुटली पाहिजे. तालुक्यात तीन मोठी धरणे होऊनही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही कायम आहेत. - राजेंद्र विशे

रोजगारीचा प्रश्न ही मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी उपाययोजना झाली नाही. केवळ रोजंदारीवरील कामासाठी तरूणांची नियुक्ती म्हणजे रोजगार उपलब्ध केला असे नाही. रु ग्णांना सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. - माधव भेरे

हे घडलंय...

  • गावागावातील रस्ते शहरास जोडले
  • भावली धरणातील पाण्यासाठी प्रयत्न
  • एमआयडीसी आणण्याचे काम केले.
  • नवीन बस डेपोच्या कामास मंजुरी
  • रु ग्णालयात आवश्यक विभाग वाढविण्यावर भर


हे बिघडलंय...

  • रस्त्यांची कामे निकृष्ट
  • पाणीयोजना अपूर्ण
  • कंपन्या असूनही स्थानिकांना बाहेर जावे लागते
  • उच्चशिक्षण घेऊनही तरु णांना काम नाही


का सुटले नाहीत प्रश्न?
भावली धरणातून तालुक्याला पाणी मिळावे हा प्रश्न मीच सोडवला. याचे श्रेय भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी घेतले. दोघांमध्ये श्रेयवाद रंगला. ज्या पद्धतीने मागणी करण्यात आली होती त्यानुसार निधी उपलब्ध झाला नसल्याचे सांगण्यात आले. मागील दहा वर्षांपासून सुरू असणारी बिरवाडी सिंचन योजना ८ कोटी ७५ हजारावरून १९ कोटी ४५ हजारांवर जाऊनही आजपर्यंत पूर्णत्वाला आलेली नाही.परिणामी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पाच वर्षांत काय केलं?
तालुक्यात खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे .मात्र त्यासाठीच्या सुविधा असणे गरजेचे असतानाही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. तालुक्याला एक क्र ीडासंकुल असावे यासाठी खर्डी येथील जागा उपलब्ध करून दिली असली तरी त्यासाठी लागणारा निधी आजपर्यंत उपलब्ध करून देता आला नाही. त्यामुळे ती घोषणाच राहिली. यामुळे तालुक्यात चांगले खेळाडू असले तरी केवळ सुविधांअभावी त्यांना तालुक्याबाहेर प्रशिक्षणासाठी जावे लागत असल्याबद्द नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Shahapur taluka backward without question; A review of the constituency of MLA Pandurang Barora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.