शहापूर तालुक्यात आरोग्य विभागच सलाइनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:45 PM2018-07-26T23:45:36+5:302018-07-26T23:46:56+5:30

अनेक पदे रिक्त; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा डोळेझाकपणा

In Shahapur taluka, the health department is on line | शहापूर तालुक्यात आरोग्य विभागच सलाइनवर

शहापूर तालुक्यात आरोग्य विभागच सलाइनवर

googlenewsNext

किन्हवली : रिक्त कर्मचारीपदांमुळे शहापूर तालुक्यातील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचा बोजवारा उडाल्याचे दिसते आहे. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा त्रास होत असताना आरोग्य विभागातील अशी परिस्थिती रुग्णांसाठी त्रासाची ठरते आहे.
तालुक्यातील किन्हवली, कसारा, अघई, पिवळी, डोळखांब, साकडबाव, शेंद्रूण, शेणवा, टाकीपठार, टेंभा, वासिंद या नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ५६ उपकेंद्रे असून तळवडा, गुंडे, वाशाला इथे फिरते पथक आहे. यातील तळवाडा, साकडबाव, टाकीपठार, कसारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच पदे रिक्त आहेत. तर, अनेक प्राथमिक केंद्रांत एएनएम, एमपीडब्ल्यू, वाहनचालक, शिपाई या पदांवर कोणीही नाही. तालुका मुख्यालयात तर सुपरवायझरचे पद रिक्त आहे.
पावसाळ्यात तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातून रु ग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात. मात्र, अनेक डॉक्टरांचीच पदे रिक्त असल्याने त्यांना खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. अनेक आरोग्य कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची ओरड ग्रामस्थ करताना दिसतात.
जिल्ह्यातील एकमेव आदिवासी पेसा तालुका असताना तालुक्यात जिल्हा परिषदेच्या या आरोग्य केंद्रात पदे रिक्त असल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह राज्य शासनाच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य समित्या नेमणुका अजूनही जाहीर झाल्या नसून किन्हवली आणि कसारा येथील इमारत कामामुळे रु ग्णांना आरोग्यसेवा मिळण्यात त्रास सहन करावा लागतो आहे.

मी फेब्रुवारीत आरोग्य समिती सभापती झाल्यापासून राज्य शासनाकडे १५ पत्रव्यवहार केले आहेत. पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- सुरेश म्हात्रे, सभापती,
जिल्हा परिषद ठाणे

ही पदे ग्रामविकास विभागातर्फे भरली जातात. कर्मचारी उपलब्ध झाल्यास तालुक्यात ही पदे देण्यात येतील.
- मनीष रेंघे,
जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्हास्तरासह तालुका आरोग्य विभागातर्फे कर्मचाºयांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिक्त पदांचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवला आहे.
- अंजली चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी, शहापूर

Web Title: In Shahapur taluka, the health department is on line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.