शहापूर तालुका : मातामृत्यूच्या प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:05 AM2018-08-14T03:05:30+5:302018-08-14T03:05:49+5:30
शहापूर तालुक्यात २०१५-१६ च्या मानाने मातामृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सरकारने अनेक उपाययोजना करूनही तालुक्यात मातामृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
- जनार्दन भेरे
भातसानगर : शहापूर तालुक्यात २०१५-१६ च्या मानाने मातामृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सरकारने अनेक उपाययोजना करूनही तालुक्यात मातामृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यात महिलांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे हे यावरून दिसते.
कमी वयात लग्न होणे,आहाराची कमतरता,आरोग्याकडे पुरेसे लक्ष न देणे,योग्यवेळी आराम न मिळणे याबरोबरच डॉक्टर उपलब्ध न होणे, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, प्रसूतीच्यावेळी कमी यंत्रणा या अशा अनेक कारणांनी हे प्रमाण दोन वर्षात वाढले आहे. दोन वर्षाची आकडेवारी पाहता अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी झाले असल्याचे पाहायला मिळते.
शहापूर तालुक्यात माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी कोणतीही कसर केली जाणार नाही.
- डॉ. अंजली चौधरी,
आरोग्य अधिकारी.
ग्रामीण भागातील नागरिक गरोदर मातांना वेळीच रु ग्णालयात आणून उपचार व्यवस्थित घेत नसल्यानेही अशा समस्या निर्माण होतात.
-राजेश म्हस्के, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय.