शहापूर शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:07+5:302021-03-16T04:40:07+5:30
शहापूर : शहापूर शहर हे विकासाच्या स्पर्धेत मागे राहिले आहे. शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी शहापूरमध्ये सत्तांतर होण्याची गरज आहे. भाजपने ...
शहापूर : शहापूर शहर हे विकासाच्या स्पर्धेत मागे राहिले आहे. शहराला प्रगतीकडे नेण्यासाठी शहापूरमध्ये सत्तांतर होण्याची गरज आहे. भाजपने ज्या गतीने जिल्ह्यात विकासकामे उभारलेली आहेत, त्याच धर्तीवर शहापूर शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही खासदार कपिल पाटील यांनी शनिवारी येथे दिली.
शहापूर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभाग क्र. ११ मधील काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खासदारांनी संवाद साधताना सांगितले की, आजची सभा ही शहापूर नगरपंचायतीच्या येत्या निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी आहे. सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे. शहराच्या खऱ्या अर्थाने विकासासाठी शहापूर नगरपंचायतीची सत्ता भाजपकडे असण्याची गरज असल्याचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. अनेक वर्षे शहरातील सत्ता ही शिवसेनेकडे असल्याचे सांगून अनेक वर्षांत सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा बोजवारा उडवलेला आहे. वीस वर्षांत साधी पाण्याची समस्याही सत्ताधाऱ्यांनी सोडवलेली नाही. त्यामुळे त्यांना मत मागण्याचा अधिकार उरलेला नसल्याचे प्रतिपादन भाजपचे शहर संयोजक प्रशांत फुले म्हणाले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, काशीनाथ भाकरे, तुकाराम भाकरे, कमलाकर घरत, नगरसेविका वैदेही नार्वेकर, नगरसेवक अजित आळशी, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा शीतल तोंडलीकर, उपाध्यक्षा अलका झवर, विधी महाजन, गीतांजली महाजन, मिताली भोपतराव, हिरा भांगरे, प्रतीक्षा आळशी, अस्मिता आळशी, उषा करण, दर्शना गोतरणे, सामिया शेख, माजी नगरसेवक भास्कर भांगरे, समीर माने, डॉ. अजित पोतदार, भाऊ गवाळे, गणेश धसाडे, शहर उपाध्यक्ष राहुल पोवळे, सरचिटणीस विकास कुलकर्णी, सतीश गुजराथी, प्रकाश शहा, शहराचे सर्व बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.