ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले 'शब्द तुझे सूर माझे', कार्यक्रमात रंगली सुरांची मैफिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 04:28 PM2019-09-30T16:28:22+5:302019-09-30T16:31:10+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सुरांची मैफिल रंगली.
ठाणे : ४५० व्या कट्ट्याचे वेध लागलेल्या अभिनय कट्ट्यावर अवतरली आणखी एक सुंदर कलाकृतीची साक्षीदार सुंदर संध्याकाळ. औचित्य होते सूर वृंदावन प्रस्तुत वृंदा दाभोलकर दिग्दर्शित आणि कौस्तुभ दाभोलकर ह्यांनी संगीत दिग्दर्शित केलेला शब्द सुरांच्या मैफलीत सजलेला एक कार्यक्रम 'शब्द तुझे सूर माझे'.
कविता म्हणजे काय ह्याची सुंदर व्याख्या सांगणारी कविता सादर करीत वृंदा दाभोलकर ह्यांनी कार्यक्रमाला सुंदर सुरुवात केली. वैभव दळवी ह्यांनी शब्दबद्ध केलेली आणि अनुराग गोडबोले ह्यांच संगीत असलेल 'शब्द विखारी तुझे मनाला'हे गीत सादर झाले.वैभव दळवी ह्यांनी आपल्या संग्रहातील काही सुरेख कविता सादर केल्या.अनुराग गोडबोले ह्यांची आणखी एक संगीतरचना आणि अरुण सांगोळेयांची शब्दरचना आणि श्रुती ह्यांनी गायलेले 'एकटे एकटे वाटते मला' हे गीत सादर झाले.कार्यक्रमात पुढे कौस्तुभ दाभोलकर ह्यांचे शब्द अनिरुद्ध जोशी ह्यांच्या स्वरात सजलेले 'वेदनेचे दुःख माझे';अनिरूद्ध गोडबोले ह्यांच संगीत ह्यांचे शब्द पुढे चाललो मी ; शब्द वैभव दळवी स्वर श्रीरंग टेम्बे ह्यांनी दिलेले 'तो शब्द मी दिलेला' ह्या गीतांचे सुंदर सादरीकरण केले. शिवानी गोखले ह्यांनी सखये ह्या कवितेचे सादरीकरण केले त्यानंतर ह्यांनी शिवानी गोखले ह्यांनी शब्दबद्ध केलेल गीत चिंब ओली देह बोले ह्या गीतांचे सादरीकरण झाले.सादर कार्यक्रमात वैभव दळवी ,शिवानी गोखले आणि वृंदा दाभोळकर ह्यांनी कविता आणि मानवी भावविश्व ह्याची सांगड श्रोत्यांसमोर उलगडून दाखविले. नविन कविता, नविन गाणी आणि नविन गायक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत या साठी धडपडणारे व्रृंदा व कौस्तुभ दाभोलकर ह्या संगीतकार जोडीने अॉडियो व्हिज्युअल पद्घतीने सादर केलेला हा कार्यक्रम रसिकांना आवडला.कॅप्टन वैभव दळवी आणि शिवानी गोखले यांच्या कवितांनी बहार आणली.अभिनय कट्ट्याचे किरण नाकती यांनी सूर व्रृंदावन च्या संपूर्ण संचाचे सन्मानचिन्ह देऊन आभार मानले.
शब्दांचे अर्थ खूप महत्वाचे असतात.आजकाल गीतातून शब्दांचं महत्व कुठेतरी हरवताना दिसतंय त्यात असा सदाबहार शब्दांचा अर्थ आणि त्याला साजेसे संगीत ह्याचा सुंदर मेळ असलेला सुंदर कार्यक्रम खरच वेगळेपण जपणारा होता.प्रत्येक गीत प्रत्येक कविता आणि त्याचे विश्लेषण खरोखरच सुंदररित्या कार्यक्रमात गुंफलेलं होत असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.