शन्नाच्या आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 06:03 PM2018-10-01T18:03:07+5:302018-10-01T18:03:23+5:30
जिल्हा नियोजन समितीची बैठक तब्बल 9 महिन्यांनंतर घेतल्याने सतीश पाटील यांनी उपहासाने चंद्रकांत पाटलांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावरून दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाल्याचे समजते.
डोंबिवली : शन्नाच्या चाहत्यांनी कथा, कादंबरी आणि अभिवाचन यातून त्यांच्या लेखन साहित्याचा प्रवास उलगडला. नव्याने एखादं पुस्तक वाचावं तसं पुन्हा नव्याने शन्ना प्रेक्षकांसमोर उभे राहत होते. निमित्त होते ते शन्ना साहित्यकट्टा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘‘माझ्या आठवणीतले शन्ना आणि त्यांच्या निवडक साहित्याचे वाचन’’ या कार्यक्रमाचे.
शन्नाच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘द आर्ट स्टुडिओ’ येथे नुकतेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सुश्रुषा जान्हवी नवरे यांनी मनमोकळ्य़ा गप्पा मारल्या. शन्नाच्या आठवणीमधून शन्नाचे वेगवेगळे स्वभावपैलू त्यांचा घरातील वावर, गोष्टीवेल्हाळपणा आणि त्यांचे काही किस्से सांगत त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. शन्नाचे चाहते आरती मुनीश्वर, दिपाली काळे, धनश्री साने यांनी शन्नाच्या साहित्यातील निवडक प्रसंगाचे अभिवाचन केले. आणि त्यांचे स्नेही मनोज महेता यांनी शन्नाच्या सोबतीच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर पूर्ण साहित्याशी ते एकरूप झाले. साहित्याची सेवा करताना त्यातून जे जे आर्थिक लाभ उभं राहिले ते त्यांनी सामाजिक कामाला सुपूर्त केले यांचा मी साक्षीदार असल्याचे महेता यांनी सांगितले. नवरे यांचा सहवास लाभलेले अनेक रसिक यावेळी उपस्थित होते.
शन्नांचे लेखन म्हणजे वाचकांना नेहमीच अंतमुर्ख करणारे होते. खुसखुशीत शैली आणि कथा, कादंबरीमधील पात्रांची विविधरंगी पण ठसठशीत व्यक्तीमत्त्व हे शन्नांच्या लेखणीचे वैशिष्टय़. शन्ना म्हणजे आनंदाचे झाड असा विशेष उल्लेख त्यांच्या चाहत्यांनी यावेळी केला. शन्नाच्या आठवणी ताज्या होत असताना कित्येकदा प्रेक्षकांचे डोळे पाणावले. ‘गुंतता हदय हे, गुलाम या नाटकांचा उल्लेख या कार्यक्रमातून केला. कादंबरी, ललित लेखन, स्तंभलेखन, कथा, नाटक अशा सर्वच विषयांना शन्ना यांनी स्पर्श केला होता. या साहित्याचा उल्लेख या कार्यक्रमात करण्यात आला.
जान्हवी यांनी शन्ना साहित्यीक कट्टयाला शुभेच्छा दिल्या. या कट्टयातर्फे कविता, गझल, लहान मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात. नवोदितांना प्रोत्साहत्न मिळावं याकरिता वेगवेगळ्य़ा उपक्रमाद्वारे कट्टा प्रयत्नशील राहणार आहे. तसेच लवकरच शन्नाच्या नावे पुरस्कार देऊन नवोदितांना प्रोत्साहन द्यावे असा मानस काही चाहत्यांनी व्यक्त केला.