शरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम, अभिनेत्री उषा नाईक यांना गंगा जमुना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 02:11 AM2019-12-14T02:11:51+5:302019-12-14T02:12:22+5:30
साहित्य, सिनेनाट्य क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
ठाणे : प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेता शरद पोंक्षे यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार, तर गेली अनेक दशके आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री उषा नाईक यांना या वर्षीच्या गंगा-जमुना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामिगरीबद्दल प्रशांत डिंगणकर, शिक्षण क्षेत्रात उल्लेखिनय कामिगरी केल्याबद्दल बाळासाहेब खोल्लम तर लक्षवेधी कलावंत माधुरी करमरकर यांनाही जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी राम गणेश गडकरी रंगायतन येथे सांयकाळी ५ वाजता होणाºया जनकवी पी. सावळाराम स्मृती समारोह समारंभामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
गृहमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडणार आहे. यावेळी खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुद्धे, कुमार केतकर, आ. प्रताप सरनाईक, डॉ.जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, प्रमोद पाटील, अॅड.निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, आयुक्त संजीव जयस्वाल आदींसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार
शरद पोंक्षे यांना देण्यात येणाºया पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे. गंगा जमुना पुरस्कार प्रदान करण्यात येणाºया उषा नाईक यांच्याही पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम ५१ हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे. साहित्यिक क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल डिंगणकर यांना तर शैक्षणिक क्षेत्रातील कामिगरीबद्दल खोल्लम आणि लक्षवेधी कलाकार म्हणून माधुरी करमरकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांना रोख रक्कम २१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.