Sharmila Thackeray: 'कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्यानंतर आता सगळीकडे मराठी दिसतंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 08:58 PM2022-02-27T20:58:29+5:302022-02-27T21:03:43+5:30

मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने "गौरव महिलांचा" या कार्यक्रमाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे रविवारी करण्यात आले

Sharmila Thackeray: 'After MNS activists took up cases, now Marathi is seen everywhere', Sharmila raj Thackery | Sharmila Thackeray: 'कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्यानंतर आता सगळीकडे मराठी दिसतंय'

Sharmila Thackeray: 'कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्यानंतर आता सगळीकडे मराठी दिसतंय'

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राचे जेष्ठ कवी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (Vishnu Vaman Shirwadkar) उर्फ कुसुमाग्रज (Kusumagraj)  यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din) किंवा मराठी राजभाषा दिन (Marathi Rajbhasha Din)  म्हणून साजरा केला जातो. जगभरातील मराठी भाषिकांनी आज हा दिवस साजरा केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मोठ्या उत्साहात हा दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनीमनसेचं मराठी भाषेतील योगदानच समजावून सांगितलं. 

मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने "गौरव महिलांचा" या कार्यक्रमाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे रविवारी करण्यात आले. गडकरी रंगायतनमध्ये तुडूंब गर्दीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती होती. तर, मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष आविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, अभिजीत पानसे. सरचिटणीस रीटा गुप्ता, जयश्री देशपांडे व मान्यवरही उपस्थिती होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आयोजित हा मेळावा आगामी महापालिका निवडणूकांची नांदीच असल्याची चर्चा रंगली आहे. यावेळी, बोलताना शर्मिला ठाकरेंनी 15 वर्षांपूर्वी मनसेनं केलेल्या आंदोलनाचाच हा परिणाम असल्याचं म्हटलं. मनसेनं मराठीचा आग्रह धरल्याने आज मुंबईत मराठी दिसतेय, असेही त्यांनी सांगितलं. 

''सर्वांना मराठी दिनाच्या शुभेच्छा, आपण सगळ्यांशी मराठीत बोलायला हवं. मग तो अमेझॉन असो, डॉमिनो असो, उबेर असो. मनसेनं जी आंदोलनं केली, त्यानंतर सगळीकडे मराठी भरती करण्यात आली. अभिजात भाषेच्या दर्जासाठी आम्हीही स्वाक्षरी मोहिम केलेली आहे, केंद्र सरकारला आम्हीही पत्र पाठवत आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना आनंद होती नाही आंदोलन करायला, केसेस अंगावर घ्यायला. पण, कार्यकर्त्यांनी केसेस अंगावर घेतल्यानंतर आता सगळीकडे मराठी दिसंतय. एअरटेल असो किंवा इतर कंपन्यांमध्येही आता मराठी पाहायला मिळतेय,'' असे शर्मिला ठाकरेंनी म्हटलं.  

मोबाईल कंपन्यांनी मराठीत कस्टमर सेवा सुरू केली, राज्यातील सर्व दुकानांत मराठीत पाट्या लागल्या आहेत. कॉन्वेंटमध्येही आता मराठी भाषा सक्तीची केली आहे. आपण, 15 वर्षांपूर्वी ती कानाखाली मारली त्याचा हा आवाज आहे, असेही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं. 

Web Title: Sharmila Thackeray: 'After MNS activists took up cases, now Marathi is seen everywhere', Sharmila raj Thackery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.