ठाण्यातील संगीत कट्टयावर शशी कपूर स्पेशल, सुपर हिट गाण्यांची रसिकांना मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:51 PM2018-02-17T15:51:42+5:302018-02-17T15:55:09+5:30
अभिनय कट्ट्याप्रमाणे संगीत कट्ट्यानेही रसिकांना भुरळ घातली. शाहसी कपूर यांच्या दर्जेदार गाण्यांची मेजवानी ठाणेकरांना मिळाली.
ठाणे : संगीत कट्टा क्र.४ गायकांसोबत वादकांनीही गाजवला : आदित्य प्रतिष्ठान ठाणे ह्या संस्थे अंतर्गत चालणाऱ्या संगीत कट्ट्याचा ४ था कट्टा १६ फेब्रु. रोजी दिमाखात पार पडला. यावेळी संगीत कट्टयावर शशी कपूर स्पेशल अंतर्गत शशीजींवर चित्रीत अनेक सिनेमांमधील सुपरहिट गाणी गायकांनी सादर केली.
श्रोते प्रतिनिधी राजन मयेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरवात झाली. प्रणव कोळी याने शंकर महादेवन यांनी गायलेले "गणनायकाय" या गीताद्वारे गणपतीची आराधना करत कार्यक्रमास सुरवात केली. पुढे ज्ञानेश्वर मराठे यांनी "वक्त करता जो वफा" ,"सुहानी चांदणी राते" "चंचल शीतल" या गाण्यांद्वारे श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले तर विनोद जींनी "खिलते हे गुल यहा", "लिखे जो खत तुझे" , किरण जींनी "तुम बिन जाऊ कहा" , राजू जींनी "ओ मेरी शर्मिली" ही गाणी वैयक्तिक रित्या सादर करत श्रोते रसिकांच्या टाळ्या लुटल्या आणि . या नंतर चेंबूर चा नितीश माहुलकर या कलाकाराने सेक्सओफोन वाद्यावर विविध गाणी सादर करत सर्वांची मने जिंकली तर १० वर्षीय राज सिनलकरने सिंथेसाईझरवर आपल्या अदाकारीने तुमसे मिलकर है परिंदा चित्रपटातील गाण्यासोबतच अनेक इतर गाणी सादर करत श्रोत्यांच्या मनातील तर छेडले. दरम्यान संगीत कट्ट्याचे रचेते किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना नितीश आणि राज यांच्यावर गुणवत्तेवर स्तुतीसुमने उधळत सन्मानचिन्हाद्वारे दोघांचाही गौरव केला.
पुढे पब्लिक चॉईस या मध्ये प्रेक्षकांमधून मोहन पानसरे यांनी पंकज उदास यांची गझल किशोर सोनवणे आणि नेहा कुलकर्णी ने रुपेरी वाळूत ही गाणी सादर केली.कार्यक्रमाच्या अंतिम सदरामध्ये राजू-सुवर्णा यांनी तोता मैना की कहानी , तर विनोद व गौरी यांनी आज मदहोश हुआ जाए रे, किरण व सुवर्णा यांनी केहदु तुम्हे, राजू व किरण यांनी जानू मेरी जा, विनोद व राजू यांनी यम्मा यम्मा ही शशी जिंची अजरामर गाणी सादर करत प्रेक्षकांना अंतर्मुख करत ४ थ्या संगीत कट्टयावर शशी कपूर पर्व उभे केले. सदर कट्ट्याची निवेदनाची धुरा स्वप्नील काळे आणि वैभव चव्हाण यांनी सांभाळली.प्रत्येक कट्ट्यागणिक वाढत असलेली गायक व वादकांची संख्या म्हणजेच संगीत कट्ट्याला अल्पावधीतच मिळत असलेलं यश आहे .