शेलार ग्रामपंचायतीने केले सहा हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:55+5:302021-09-18T04:42:55+5:30

भिवंडी : तालुक्यातील शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने सहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सरपंच ॲड. किरण ...

Shelar Gram Panchayat vaccinated 6,000 citizens | शेलार ग्रामपंचायतीने केले सहा हजार नागरिकांचे लसीकरण

शेलार ग्रामपंचायतीने केले सहा हजार नागरिकांचे लसीकरण

Next

भिवंडी : तालुक्यातील शहरालगत असलेल्या शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने सहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती सरपंच ॲड. किरण चन्ने यांनी गुरुवारी दिली.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासकीय नियमांचे पालन करण्याबरोबरच नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र लसीचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांना लस मिळत नाही. भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याची दखल घेत स्वतः पुढाकाराने गावातील ६००६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.

५१६९ नागरिकांना पहिला डोस, तर ८३७ नागरिकांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ज्यात २० अपंग नागरिक, १८ गरोदर माता व ४४ स्तनदा मातांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेलार गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू केलेल्या प्रशस्त कोविड सेंटरमध्ये तीन वैद्यकीय अधिकारी, सहा नर्स, चार वाॅर्डबॉय व चार ऑनलाइन वर्कर अशा एकूण १३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केल्याची माहिती सरपंच चन्ने यांनी दिली.

शेलार ग्रामपंचायतीने सुरुवातीपासून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले आहे. गावात सॅनिटायझर स्टॅण्ड, औषध फवारणी, स्वछता या सर्व बाबींची पूर्तता केलेली आहे. सध्या शेलार गावात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याने शेलार कोविड सेंटरमध्ये तीन ठिकाणी लसीकरण सेंटर सुरू केले आहे. सेंटरच्या बाजूलाच असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातही लसीकरणाची सोय केली आहे. तसेच स्वतंत्र बैठक व्यवस्था, चहापाणी याची सुविधाही पंचायतीच्या वतीने केली असल्याची माहिती सरपंच्यांनी लोकमतला दिली.

Web Title: Shelar Gram Panchayat vaccinated 6,000 citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.