अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय गप्प बसणार नाही: तानाजी सावंतांनी दिला विरोधकांना इशारा
By अजित मांडके | Published: April 22, 2023 04:57 PM2023-04-22T16:57:51+5:302023-04-22T16:58:57+5:30
मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: हापकीन वरुन मला डिवचले जात आहे. मात्र इलेक्ट्रील इंजिनिअर, शुगरमध्ये पीएचडी केलेली आहे, आणि मी स्वत: रिसर्चर आहे. त्यामुळे मला डिवचू नका अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराच राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिला आहे.
मागील काही महिन्यापूर्वी हापकीनच्या मुद्यावरुन तानाजी सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती. त्याचा समाचार शनिवारी त्यांनी ठाण्यातील सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलच्या भुमीपुजनाच्या निमित्ताने घेतला. १९८६ मध्ये इलेक्ट्रीक इंजिनिअरींगमध्ये गोल्ड मीडल मिळविले आहे. त्यानंतर लेक्चरर म्हणून काम केले. पुढे पूण्यात २००१ पासून १०० इस्टंट्युट चालवत आहे. २००८ मध्ये पहिला साखर कारखाना काढला. त्यानंतर त्याचे ८ कारखाने झाले आहेत. मी मेहनतीवर साखर कारखाने उभे केले आहेत, कोणाकडून विकत घेतले नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टिका केली. मी रिर्सचस असल्याने आता आरोग्य विषयाचे प्राधिकरण तयार करीत आहेत. येत्या १० दिवसात ते प्राधिकरण अस्तिवात येईल असेही ते म्हणाले.
येत्या काळात महाराष्ट्रात हेल्थकार्ड उपलब्ध करुन दिले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयाचे काम हे १८ महिन्यात पूर्ण झाले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी मी वेगळ्या पध्दतीने काम करीत असून प्रत्येक महिन्याचा कामकाजाचा डेटा मी घेणार आहे. त्यामुळे वेळेत काम करण्याची तंबीच त्यांनी यावेळी दिली. कोरोना वाढत असला तरी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले परंतु आजार अंगावर काढू नका असेही त्यांनी सांगितले. टाक्सफोर्सची शुक्रवारी बैठक घेण्यात आली असून १५ मे पर्यंत कोरोना ओसरलेला दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु कोरोना वाढतो म्हणून आम्ही लगेच लॉकडाऊन करणार नाही, आधीचे सरकार असते तर त्यांनी लगेच लॉकडाऊन केला असता असा टोलाही त्यांनी लगावला.
कपील पाटील - ग्रामीण भागात कोणीही डॉक्टर टिकत नाही. इंटनशीप झाली की लगेच निघून जातात. एकीकडे विकास सुरु आहे. तर ग्रामीणमध्ये सुविधा नसल्याचे दिसत आहे. बदलापुरचे रुग्णालय १०० बेडचे करावे, शहापुर उपजिल्हा रुग्णालय करावे, खर्डी येथे ट्रॉमा सेंटर सुरु करावे, सुपरस्पेशलीटी हॉस्पीटल असे निर्माण करावे की एकाही रुग्णाला मुंबईला जाण्याची वेळ येऊ नये अशी मागणी केंद्रीय पचांयत राजमंत्री कपील पाटील यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"