ठाण्यात शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का, ९ माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटात जाणार, ही नावं चर्चेत

By रणजीत इंगळे | Published: January 25, 2023 05:11 PM2023-01-25T17:11:49+5:302023-01-25T17:12:50+5:30

Thane Politics: ठाण्यात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगलेला असतानाच पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नजीब मुल्ला राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्राकडून मिळालेली आहे.

Shinde group shocks NCP in Thane, 9 former corporators will soon join Shinde group, these names are in discussion | ठाण्यात शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का, ९ माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटात जाणार, ही नावं चर्चेत

ठाण्यात शिंदे गटाचा राष्ट्रवादीला धक्का, ९ माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटात जाणार, ही नावं चर्चेत

googlenewsNext

- रणजीत इंगळे 
ठाणे  -  ठाण्यात गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगलेला असतानाच पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे एकूण सात  नगरसेवक शिंदे गटात जाणार आहेत. यामध्ये ठाणे शहर आणि मुंब्र्यातील काही नगरसेवक आहेत. हनुमंत जगदाळे आणि मुंब्र्यातील राजन किणी, अनिता किणी यांच्यासोबत असलेले नगरसेवक शिंदे गटात जाणार कि मुंब्रा विकास आघाडी स्थापन करणार यावर  खलबतं सुरु आहे. मुंब्रा हा मुस्लिम बहुल आणि  आव्हाडांचा  बालेकिल्ला असून राष्ट्रवादीचे नगरसेवक शिंदे गटात गेल्यावर मतदार त्यांच्या पाठीशी राहील कि नाही अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळेच  जितेंद्र आव्हाडांना शह देण्यासाठी मुंब्र्यात 'मुंब्रा विकास आघाडी' स्थापन करून एकनाथ शिंदे गट या आघाडीला छुपा पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे. मुस्लिमबहुल आणि आव्हाडांना मानणाऱ्या  मुंब्रा मध्ये राष्ट्रवादीला धक्का बसेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण आता मुंब्र्यात धर्मावर राजकारण न होता विकासावर होत असल्याचे बोलले जात आहे.

जरी माजी नगरसेवक शिंदे गटात गेले तरी स्थानिक मतदार त्यांना पाठिंबा देतील का हा  देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाला लागलेल्या बॅनर वरून चर्चा रंगली होती आणि नजीब मुल्ला हे राष्ट्रवादी सोडून शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात होतं. मात्र आता नजीब मुल्ला राष्ट्रवादीतच राहणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्राकडून मिळालेली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेले आणि सेनेला पहिली सत्ता मिळवून देणाऱ्या ठाण्यात येणाऱ्या काही दिवसात निवडणुका आहेत. एकनाथ शिंदेच्या  बंडानंतर  ठाणे पालिकेवर कोण राज्य करेल हे पाहावं लागेल.

Web Title: Shinde group shocks NCP in Thane, 9 former corporators will soon join Shinde group, these names are in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.