उल्हासनगरात महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेचा बहिष्कार; भाजप व शिंदेसेनेचा वाद चव्हाट्यावर

By सदानंद नाईक | Published: November 3, 2024 07:16 PM2024-11-03T19:16:11+5:302024-11-03T19:22:10+5:30

सदानंद नाईक/  उल्हासनगर : भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्याबाबत काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ रविवारच्या महायुतीच्या मिळाव्यावर ...

Shindesena's boycott of Mahayuti meeting in Ulhasnagar BJP and Shindesena dispute | उल्हासनगरात महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेचा बहिष्कार; भाजप व शिंदेसेनेचा वाद चव्हाट्यावर

उल्हासनगरात महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेचा बहिष्कार; भाजप व शिंदेसेनेचा वाद चव्हाट्यावर

सदानंद नाईक/ उल्हासनगर : भाजपा शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री यांच्याबाबत काढलेल्या अपशब्दाच्या निषेधार्थ रविवारच्या महायुतीच्या मिळाव्यावर शिंदेसेनेने बहिष्कार घातला. याप्रकाराने भाजप-शिंदेसेनेचे वाद चव्हाट्यावर आले असून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांनी काढलेल्या अपशब्द प्रकरणी मेळाव्यात दिलगिरी व्यक्त केली आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-३, रिजेन्सी हॉल मध्ये शनिवारी भाजप-साई पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री बाबत अपशब्द काढले. तेंव्हा पासून शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी रामचंदानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शनिवारच्या घटनेचा पडसाद टाऊन हॉल येथील महायुतीच्या मेळाव्यावर पडला. शिंदेसेनेचे पदाधिकारी मेळाव्याच्या ठिकाणी येऊन भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कुमार आयलानी यांनी त्यांची समजूट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शिंदेसेनेचे पदाधिकारी ऐकण्याच्या परिस्थिती मध्ये नोव्हते. त्यांनी प्रदीप रामचंदानी यांच्यावर कारवाई कारण्यांची मागणी करून घोषणाबाजी केली. यावर तोडगा काढू, असे आश्वासन आयलानी यांनी देऊनही शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यावर बहिष्कार टाकून बाहेर पडले.

महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यावर भाजप व शिंदेसेनेचे वाद चव्हाट्यावर आल्याने, भाजप उमेदवार कुमार आयलानी यांची कोंडी झाली. मेळाव्याला भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह माजी खासदार जगन्नाथ पाटील, कुमार आयलानी, प्रदीप रामचंदानी, नरेंद्र राजांनी, जमनुदास पुरस्वानी, राजेश वधारिया, लाल पंजाबी यांच्यासह रिपाई आठवले गट व कवाडे गटाचे शहराध्यक्ष उपस्थित होते. शिंदेसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांनी प्रदीप रामचंदानी यांनी मुख्यमंत्री यांच्याबाबत काढलेल्या अपशब्दबाबत माफीची मागणी केली. माफी मागितली नाहीतर, आम्ही भाजपा उमेदवाराच्या प्रचारात नसेल, अशी भूमिका घेतली आहे.

Web Title: Shindesena's boycott of Mahayuti meeting in Ulhasnagar BJP and Shindesena dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.