शिरगाव कॅनॅाल दुरुस्तीचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:37 AM2021-03-08T04:37:58+5:302021-03-08T04:37:58+5:30

किन्हवली : जांभे लघुपाठबंधारे योजनेअंतर्गत मौजे शिरगाव येथील उजवा व डावा कालवा दुरुस्तीचे आदेश देऊन दोन वर्षांचा कालावधी झाला ...

Shirgaon canal repair work inferior | शिरगाव कॅनॅाल दुरुस्तीचे काम निकृष्ट

शिरगाव कॅनॅाल दुरुस्तीचे काम निकृष्ट

Next

किन्हवली : जांभे लघुपाठबंधारे योजनेअंतर्गत मौजे शिरगाव येथील उजवा व डावा कालवा दुरुस्तीचे आदेश देऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. आजही काम पूर्ण झाले नसून, झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाले नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

गेल्या २७ वर्षांपासून धरणात पाणी असूनही सुमारे २२५ हेक्टर क्षेत्र पाटबंधारे विभागाच्या उदासीनतेमुळे सिंचनापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक विकास खुंटला आहे.

२०१८ पासून कॅनॅालच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांनी सरकारकडे पाठपुरावा करून दुरुस्तीचे काम मंजूर करून घेतले. शिरगाव येथील उजवा, डावा कालवा बांधणे, सिंमेट ट्रफमध्ये बांधणे, दुरुस्ती व नूतनीकरणासाठी अंदाजे १.५ कोटी निधी मंजूर झाला. त्यामध्ये उजवा कालवा १६५० मीटर व डावा कालवा १२५० मीटर बांधून ३००, ६०० व ९०० व्यासाचे सिमेंटचे पाईप वापरले. ९७ मीटरचे काम तसेच पाणी साठवणुकीसाठी टाकी बांधण्याकरिता निधी मंजूर झाला आहे; परंतु ठेकेदार यांनी अंदाजपत्रकानुसार काम न करता अगदीच सुमार व निकृष्ट काम केल्याने सरकारचा निधी वाया गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हे काम कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट व धिम्या गतीने सुरू आहे. केवळ १५ मजूर हे काम करत आहेत, अशी लेखी तक्रार ग्रामस्थांच्या सहीने अधीक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. नळ योजनेचे काम तांत्रिकदृष्ट्या निकृष्ट झाल्याने सरकारचा १.२७ कोटी खर्च वाया जाऊन २७ वर्षे येथील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिला होता. याचीच पुनरावृत्ती होऊन या निकृष्ट कामामुळे १.५० कोटी निधी वाया जाणार असून, यापुढेही पाणी सिंचनासाठी व्यवस्थित मिळेल याची खात्री नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

------------------------

कोट

या कामाविषयी शेतकऱ्यांची तक्रार बघून होत असलेल्या कामाची चौकशी केली जाईल.

- महाजन, कार्यकारी अंभियता

Web Title: Shirgaon canal repair work inferior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.