अंबरनाथ शहरात आमदार गद्दार असल्याचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 01:18 PM2022-06-27T13:18:29+5:302022-06-27T13:19:37+5:30

डॉ. किणीकर  हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत आहेत. शिंदे यांनी त्यांच्यावर काही आमदारांची जबाबदारीही सोपवली होती. किणीकर हे शिंदे गटाचे ‘खंदे समर्थक’ म्हणून ओळखले जातात.

Shiv sainik Against of MLA balaji kinikar | अंबरनाथ शहरात आमदार गद्दार असल्याचे फलक

अंबरनाथ शहरात आमदार गद्दार असल्याचे फलक

Next

अंबरनाथ : आमदार बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात असल्याने आता त्यांच्याविरोधात काही शिवसैनिकांनी बॅनरबाजी सुरू केली आहे. आमदार गद्दार असल्याचे पत्रके शहरभर चिकटविले आहेत तर शहराच्या मध्यवर्ती भागात भला मोठा बॅनर लावत संताप व्यक्त केला आहे.

डॉ. किणीकर  हे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत आहेत. शिंदे यांनी त्यांच्यावर काही आमदारांची जबाबदारीही सोपवली होती. किणीकर हे शिंदे गटाचे ‘खंदे समर्थक’ म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या बंडखोरीमुळे आता अंबरनाथच्या शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. 
शनिवारी मध्यरात्री काही संतप्त शिवसैनिकांनी आमदार गद्दार असल्याचे पत्रक शहरभर लावले तर हुतात्मा चौकात मोठा बॅनर लावून  निषेध व्यक्त केला.

त्याची माहिती मिळताच पोलिसांनी हे बॅनर उतरवले असून काही ठिकाणचे पत्रकही काढून टाकले आहेत. तरी शहरातील काही अंतर्गत भागांत आमदारांच्या विरोधातील पत्रके तशीच राहिली आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर फाडून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली होती. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली असली तरी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
 

Web Title: Shiv sainik Against of MLA balaji kinikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.