'जय श्रीराम' नारा देत शिवसैनिक अयोध्येला रवाना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला भगवा झेंडा

By अजित मांडके | Published: April 7, 2023 04:53 PM2023-04-07T16:53:27+5:302023-04-07T16:56:30+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा राज्य आणि देशाच्या राजकीय वतुर्ळात चचेर्चा विषय ठरला आहे.

Shiv Sainiks leave for Ayodhya from Thane; CM Eknath Shinde showed the green flag to train | 'जय श्रीराम' नारा देत शिवसैनिक अयोध्येला रवाना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला भगवा झेंडा

'जय श्रीराम' नारा देत शिवसैनिक अयोध्येला रवाना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला भगवा झेंडा

googlenewsNext

ठाणे : चलो अयोध्याच्या नाºयाला प्रतिसाद देत शुक्रवारी सुमारे दोन हजार शिवसैनिक एका विशेष ट्रेनने अयोध्येला रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे स्टेशनला हजर झाले होते. यावेळी त्यांनी या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखविला. जय श्री राम आणि शिवसेनेच्या घोषणा देत कार्यकर्ते या विशेष ट्रेनने आयोध्याला रवाना झाले.

यावेळी त्यांच्या समेवत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, बालाजी किणीकर आदींसह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या विशेष ट्रेनने ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण येथील शिवसैनिक रवाना झाला आहे. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शिवसेनेचे खासदार मंत्री आणि आमदार आयोध्येला उपस्थितीत राहणार आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे रविवारी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांवर आपल्या विभागात महाआरती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा राज्य आणि देशाच्या राजकीय वतुर्ळात चचेर्चा विषय ठरला आहे. शिवसेनेचे स्थानिक  नेते अगोदरच अयोध्येत तळ ठोकून बसले आहेत. ठाण्यातून सुमारे दोन हजारहून अधिक शिवसैनिक अयोध्येला निघाले आहेत. त्यासाठी १६ डब्यांची विशेष एसी लोकल ठाणे स्थानकातून शुक्रवारी दुपारी सव्वा चारवाजताच्या सुमारास रवाना झाली. यावेळी कार्यकर्तेंचा पेहराव देखील काही वेगळा होता. अनेकांना जय श्री रामाचे टी शर्ट परिधान केले होते. जय श्री रामाचा जयघोषही यावेळी करण्यात आला. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील हाती भगवा झेंडा घेतला होता. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचे शिंदे यांनी आर्वजुन भेट घेतली.

घरात बसणाऱ्यांना मी बाहेर काढले - एकनाथ शिंदे
माझ्या दौऱ्यामुळे सर्व जण कामाला लागले आहेत. मी घरात बसणाºयांना बाहेर काढले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांच्यावर यावेळी टिका केली. तर बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते की, आयोध्येत प्रभु रामाचे भव्यदिव्य मंदिर व्हावे आणि आज ते स्वप्न साकार होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Shiv Sainiks leave for Ayodhya from Thane; CM Eknath Shinde showed the green flag to train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.