कल्याणच्या भाजप कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:44 AM2021-08-25T04:44:43+5:302021-08-25T04:44:43+5:30

कल्याण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी मंगळवारी भाजपच्या ...

Shiv Sainiks vandalized BJP office in Kalyan | कल्याणच्या भाजप कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड

कल्याणच्या भाजप कार्यालयाची शिवसैनिकांनी केली तोडफोड

Next

कल्याण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी मंगळवारी भाजपच्या कल्याण शहर कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी कार्यालयाच्या काचा फोडल्या. कार्यालयाच्या फलकावर दगडफेक केली. तसेच एका भाजप कार्यकर्त्याला मारहाणही केली.

शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शिवसैनिकांसह भाजप शहर कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हेदेखील होते. साळवी यांनी भाजप कार्यालयाच्या फलकावर दगड भिरकावून फलक तोडण्याचा प्रयत्न केला. कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. काचा फोडताना शिवसैनिक अमोल गायकवाड यांचा हात रक्तबंबाळ झाला. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाच्या दारावर लाथा मारून कुलूपबंद दार तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दार तोडण्यास मज्जाव करणारा भाजप कार्यकर्ता प्रसाद टूमकर याला शिवसैनिकांनी मारहाण करीत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र टूमकर कार्यालयाचा परिसर सोडण्यास तयार नव्हते. हा सगळा प्रकार घडल्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण घटनास्थळी पोहचले. त्या आधीच शिवसैनिकांचा ताफा टिळकनगर शिवसेना शाखेच्या दिशेने रवाना झाला होता. राणे जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत शिवसेना आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी यावेळी दिला.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, राणे यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांचा संयम सुटला आहे. भाजपने त्यांना समज द्यावी अन्यथा शिवसैनिक शांत बसणार नाहीत.

---------------------------

Web Title: Shiv Sainiks vandalized BJP office in Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.