कल्याणमध्ये शिवसंपर्क मोहिमेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:59+5:302021-07-14T04:44:59+5:30
कल्याण : शहरात सोमवारपासून शिवसंपर्क मोहिमेला सुरुवात झाली आहे. कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ...
कल्याण : शहरात सोमवारपासून शिवसंपर्क मोहिमेला सुरुवात झाली आहे. कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ पूर्वेतील शिवसेना शाखेत करण्यात आला.
लांडगे म्हणाले, ‘कल्याण-डोंबिवलीत शिवसंपर्क अभियान १२ ते २४ जुलैदरम्यान राबविले जाणार आहे. शिवसेनेने यापूर्वी काय कामे केली, पुढे काय करायचे आहे, याचे मार्गदर्शन शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून केले जाणार आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, २०२२ मध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि महापालिका यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने ‘लक्ष्य २०२२’ ठेवले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. केडीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील. मात्र, पक्ष वाढविण्यासाठी काम सुरू झाले आहे.’
दरम्यान, या मेळाव्यास शिवसेनेचे कैलास शिंदे, हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, महिला आघाडीच्या विजया पोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
------------