विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना व भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 10:54 PM2019-02-01T22:54:43+5:302019-02-01T22:55:08+5:30

आधी पुनर्वसन मगच धरण; मोबदला न मिळाल्यास काम सुरु करु देणार नसल्याचा घेतला पवित्रा

Shiv Sena and BJP's movement for rehabilitation of displaced people | विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना व भाजपाचे आंदोलन

विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी शिवसेना व भाजपाचे आंदोलन

Next

विक्रमगड : तालुक्यातील साखरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये देहर्जा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मात्र, अजून पर्यत पुनर्वसनाचा मार्ग न निघाल्याने हे काम बंद करण्यासाठी शुक्रवारी शिवसेनाभाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन काम बंद केले. जो पर्यत योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यत हे काम सुरू करायचे नाही असा पवित्रा आदोलकानी घेतला.

या साखरे ग्रामपंचायत हद्दीतील व खुडेद हद्दीतील २७५ कुटुंबाचे पुनर्वसनाचा प्रश्न रेगाळला आहे. यासाठी आधी पुनर्वसन मगच धरण अशी मागणी आहे. या प्रकल्पात कुंडाचापाडा, महालपाडा, तसेच हनुमानपाडा, पवारपाडा यागावाचा पुनवर्सनाचा ८ प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पात अनेकाची घरे जातात तर काहीची जमिनी जातात यासाठी योग्य सर्व्हेक्षण करून योग्य माबदल दयावा तसेच कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आदोलनात भाजप शिवसेनेचे राजकीय मंडळी एकत्र आली. यामध्ये कोकण पांटबधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदिश धोंडी, प्रकाश निकम जिल्हापरिषदसदस्य, सागर आळशी, महेश आळशी , योगेश भानुशाली, आदी जण उपस्थित होते. या बाबत अजून कोणताच ठोस निर्णय झाला नसुन याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे बैठक लाऊन हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आदोलन कत्याँनी सांगितले पंरतु अधिकारी मात्र काहीच सागू शकले नाही

Web Title: Shiv Sena and BJP's movement for rehabilitation of displaced people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.