Thane News: ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये रंगणार फोडाफोडीचा खेळ, सेनेचे ३० पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 11:13 AM2022-01-30T11:13:01+5:302022-01-30T11:21:33+5:30

Thane News: येत्या काही दिवसांत ठाण्यातील भाजपचे काही नगरसेवकदेखील शिवसेनेत डेरेदाखल होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे शिवसेनेचे ३० पदाधिकारी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा त्या पक्षाने केला. यात काही नगरसेवकांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

Shiv Sena-BJP game to be played in Thane, | Thane News: ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये रंगणार फोडाफोडीचा खेळ, सेनेचे ३० पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात?

Thane News: ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये रंगणार फोडाफोडीचा खेळ, सेनेचे ३० पदाधिकारी भाजपाच्या संपर्कात?

Next

- अजित मांडके

ठाणे - शिवसेनेने कळवा आणि मुंब्रा मिशन सुरू केल्यानंतर आता दिव्यातही भाजपला कोंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना केली. भाजपमधील नाराज आदेश भगत यांना शिवसेना प्रवेश देऊन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. येत्या काही दिवसांत ठाण्यातील भाजपचे काही नगरसेवकदेखील शिवसेनेत डेरेदाखल होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे शिवसेनेचे ३० पदाधिकारी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा त्या पक्षाने केला. यात काही नगरसेवकांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगल्याने ठाण्यातील राजकारणातून भाजप लांब गेल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेकडून काही दिवसांपासून ‘मिशन कळवा’ राबविण्यात येत आहे. तसेच मुंब्य्रातही शिवसेनेने राष्ट्रवादीला आपले धक्कातंत्र दाखवले. प्रभाग रचनेत बदल करून राष्ट्रवादीला धक्का देण्याचा प्रयत्न शिवसेना लवकरच करणार आहे. महापालिकेत पुन्हा एकहाती सत्ता स्थापन करण्याची शिवसेनेची ही खेळी आहे. महापालिकेत १०० नगरसेवक पाठविण्याचे शिवसेनेचे लक्ष्य आहे. ८० ते ८५ नगरसेवकांपर्यंत मजल मारण्याचा दावा शिवसेनेचे नेते खासगीत करतात. त्याच मोहिमेकरिता राष्ट्रवादी व भाजपला धक्के देण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. दिव्यातील भाजपचे नाराज असलेले आदेश भगत यांना शिवसेनेत दाखल करून घेतले आहे. वास्तविक, दिव्यात सर्वच्या सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे आदेश यांच्या येण्याने शिवसेनेला फारसा फायदा होईल असे नाही. मात्र भाजपची ताकद कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे.

येत्या काही दिवसांत भाजपमधील काही दिग्गज नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेच्या उच्चपदस्थ सूत्रांनी केला. त्याचा मुहूर्त फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात असल्याचे बोलले जात आहे. जुन्या ठाण्याबरोबर घोडबंदरवर शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. कोपरीतदेखील भाजपला धक्का देण्याचा शिवसेनेचा विचार आहे.

भाजपनेदेखील शिवसेनेचे ३० महत्त्वाचे पदाधिकारी आपल्या छावणीत असल्याचा दावा केला. शिवसेनेने धक्का दिल्यास आम्हीही त्यांना धक्का देऊ, असा दावा भाजपने केला. गनिमी काव्याने या खेळी खेळल्या जात आहेत. त्यामुळे येत्या काळात पक्षबदलीचे वारे ठाण्यात वाहण्यास सुरुवात होणार आहे. 

Web Title: Shiv Sena-BJP game to be played in Thane,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.