राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात शिवसेना, भाजपाचे आंदोलन !
By सुरेश लोखंडे | Published: March 25, 2023 05:32 PM2023-03-25T17:32:24+5:302023-03-25T17:33:10+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे.
ठाणे : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. ओबीसी समाजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली ठाण्यात त्यांच्या निषेधार्थ भाजपा व शिवसेने वेगवेगळे आंदोलन आज छेडले. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कोर्ट नाका येथे झालेल्या आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजही सहभागी झाला होता. या आंदोलनात राहुल गांधी यांचा भाजपाने तीव्र शब्दांत धिक्कार केला. यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, संजय वाघुले आदीसह संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. गांधी यांनी 'मोदी'आडनावावरून अपमानास्पद वक्तव्य केले. त्यातून ओबीसी व समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला.
भाजपा पाठोपाठ राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केला, त्यांच्या या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील आनंद आश्रम येथून ठाणे काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच हा मोर्चा मध्येच अडवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसैनिकांनी केली.