शिवसेना-भाजपचे नाते नैसर्गिक, ते कधी तुटत नसते; महापौरांच्या विधानाने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 12:05 AM2022-03-05T00:05:42+5:302022-03-05T00:06:19+5:30

ठाणे महापालिका नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ आता ५ मार्च रोजी संपुष्टात येणार असून महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे.

Shiv Sena-BJP relationship is natural, it never breaks; The mayor's discussion sparked new discussions | शिवसेना-भाजपचे नाते नैसर्गिक, ते कधी तुटत नसते; महापौरांच्या विधानाने चर्चांना उधाण

शिवसेना-भाजपचे नाते नैसर्गिक, ते कधी तुटत नसते; महापौरांच्या विधानाने चर्चांना उधाण

Next

ठाणे  : एकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे ठाण्यात आघाडीसाठी प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या कारर्किदीत शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये नैसर्गिक युती असल्याचे सांगत आम्ही बाजूला झाले म्हणून नाते तुटत नसल्याचे सांगून भाजपाला अवतान देऊन मैत्रीचा हात पुढे केल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.

ठाणे महापालिका नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ आता ५ मार्च रोजी संपुष्टात येणार असून महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे. तत्पूर्वी घेण्यात आलेल्या शेवटच्या महासभेत महापौरांनी भाजपचे गोडवे गातांना कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर शालजोडीतले टोले लगावले. नगरसेवकांचा कार्यकाळ संपत आल्यामुळे म्हस्के यांनी काही दिवसांपुर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्र म आयोजित केला होता. या कार्यक्र माला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दांडी मारली होती. तर भाजपचे नगरसेवकांनी मात्न कार्यक्र माला हजेरी लावली होती. हाच धागा पकडत म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना टोले मारले. राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांना स्नेह भोजनाला यायचे होते. परंतु वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे येऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. माङया स्नेहभोजनाच्या कार्यक्र माला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा इशाराही त्यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना लगावला. महाविकास आघाडीतील मित्न कार्यक्र माला आले नसले तरी भाजपचे सर्व नगरसेवक मात्न कार्यक्र माला आवर्जुन उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती होती. त्यामुळे भांडणो होऊन घरातून बाहेर पडलो तरी नाते तुटत नसते, असे विधानही त्यांनी केल्याने नव्या चर्चेला आता उधाण आले आहे. ठाणे महापालिकेच्या सभागृहात काही प्रस्तापित नगरसेवकांची मक्तेदारी होती. त्यांना वाटायचे आपल्याशिवाय इतर कोणीच बोलू नये. सर्वच बाबतीत त्यांचीच मक्तेदारी होती. त्यामुळे महापौर झाल्यानंतर प्रस्तापितांना ठरवून धक्का दिला आणि नव्या नगरसेवकांना पुढे येण्याची संधी दिल्याचे सांगत त्यांनी त्यांचे राष्ट्रवादीमधील मित्र नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आदींसह इतर प्रस्थापित नगरसेवकांना टोला लगावला. करोना काळात सत्ताधारी पक्ष असल्यामुळे पक्षावर टिका होत होती. परंतु हाडाचा शिवसैनिक असल्यामुळे सर्वांना अंगावर घेतले. तसेच स्वत:वर भ्रष्टाचाराचा एकही आरोप होऊ दिला नाही. हे सर्व करताना मैत्नीही जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

दरम्यान, जिथे तिथे उपदेश आम्हास सांगतो कोणतरी.. किर्तन सारीकडे चोहीकडे ज्ञानेश्वरी माऊली.. आमच्या हिताची एवढी वाहू नका काळजी.. जाऊ सुखे नर्कात आम्ही तेथे तरी येऊ नका.. अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर शेवटी आगपाखड केली.

Web Title: Shiv Sena-BJP relationship is natural, it never breaks; The mayor's discussion sparked new discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.