शिवसेना नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 09:45 PM2020-05-18T21:45:56+5:302020-05-18T22:19:17+5:30

कळव्यातील गणेश कांबळे हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. सोमवारी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यांनी कशामुळे

Shiv Sena corporator attempts suicide, starts treatment at hospital | शिवसेना नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

शिवसेना नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु

Next

ठाणे  : कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांनी सोमवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परंतु ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने अद्याप कारण स्पष्ट होऊ शकलेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कळव्यातील गणेश कांबळे हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. सोमवारी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यांनी कशामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याची अद्यापही कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सध्या त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. तसेच ते बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे देखील समजू शकलेले नाही.

Web Title: Shiv Sena corporator attempts suicide, starts treatment at hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.