शिवसेनेतर्फे आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:29 AM2021-05-29T04:29:35+5:302021-05-29T04:29:35+5:30
ठाणे : घोडबंदर रोड येथील आदिवासी कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे या आदिवासींचे खूपच हाल ...
ठाणे : घोडबंदर रोड येथील आदिवासी कुटुंबांना शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनमुळे या आदिवासींचे खूपच हाल झाले आहेत. हा कार्यक्रम शिवसेनेच्या उत्तर भारतीय विभागाचे ठाणे जिल्हा संघटक शशीकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. कोरोनाच्या नियमांचे पालन यावेळी करण्यात आले.
डोंगरीपाडा, आनंदनगर टकारडा, पांचवड आणि ओवळा परिसरातील गरजू नागरिकांना ही मदत करण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी आयोजकांनी आधीच लाभार्थ्यांची यादी तयार केली होती. घोडबंदर परिसरातील गरिबांसाठी शिवसेना सतत मदत करत असते. स्थानिक शिवसैनिक अशा कुटुंबांची विशेष काळजी घेतात.
नगरसेवक नरेश मणेरा, उपविभागप्रमुख अकबर शेख, वाघबीळ गावाचे शाखाप्रमुख जयवंत म्हात्रे यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रणजित यादव, दुर्गा यादव, विशाल यादव, चेतन वीरा, पारस गंगर यांनी विशेष परिश्रम घेतले.