शिवसेनेकडून शिलाई मशीन, व्हीलचेअरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:40+5:302021-07-26T04:36:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : गरीब-गरजू महिलांना शिलाई मशीन, दिव्यांगांना व्हीलचेअर, कुबड्या आदी साहित्याचे वाटप तसेच ११ व १२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : गरीब-गरजू महिलांना शिलाई मशीन, दिव्यांगांना व्हीलचेअर, कुबड्या आदी साहित्याचे वाटप तसेच ११ व १२ वीच्या विध्यार्थ्यांसाठी नीट, सीईटी परीक्षेचा सराव या शिबिराचे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगरच्या महापौर लीलाबाई अशान, शिवसेना प्रमुख चंद्रकांत बोडारे उपस्थित होते.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील स्वामी शांतीप्रकाश हॉलमध्ये शिवसेनेच्या वतीने रविवारी दुपारी १ वाजता इयत्ता ११ व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट, सीईटी परीक्षेचे मोफत ऑनलाइन मार्गदर्शन शिबिर अकॅडमी आयोजित केले होते. शेकडो विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिरासाठी नोंदणी केल्याची माहिती आ. बालाजी किणीकर यांनी दिली. तसेच गरीब व गरजू महिलांना ४० शिलाई मशीन, दिव्यांग बांधवांना ३० व्हीलचेअर, कुबड्या आदी साहित्याचे वाटप खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले.
शिवसेना सामान्य नागरिकांच्या मागे ठाम उभी राहत असून नागरिकांचा विश्वास शिवसेनाप्रमुख व मुख्यमंत्री यांच्यावर असल्याचे खासदार शिंदे बोलले. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी त्यांना सीईटी व अन्य परीक्षेचे मार्गदर्शन या वर्षात दिले जाणार असून शेकडो विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी नोंदणी केल्याची माहिती दिली.