ठाण्यात पूर्ववैमनस्यातून शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला

By जितेंद्र कालेकर | Published: August 25, 2021 10:39 PM2021-08-25T22:39:21+5:302021-08-25T22:41:53+5:30

श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्ला करणाºया अनिस याच्यावरही जमावाने दगडाने हल्ला केला असून तोही यात गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Shiv Sena division chief stabbed in Thane | ठाण्यात पूर्ववैमनस्यातून शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणा हल्ला

हल्ला करणाऱ्यावरही झाला दगडाने हल्ला

Next
ठळक मुद्दे प्रकृती गंभीरहल्ला करणाऱ्यावरही झाला दगडाने हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: श्रीरंग- वृंदावन सोसायटीचे शिवसेना विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, हल्ला करणाºया अनिस याच्यावरही जमावाने दगडाने हल्ला केला असून तोही यात गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाजारपेठेतील एका गाळयाच्या समोरील जागेवरुन अमित जयस्वाल आणि उस्मान सय्यद यांच्यात तीन ते चार महिन्यांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून उस्मानला अमित जयस्वालच्या मुलाने मारहाण केली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला आहे. याच पूर्ववैमनस्यातून बुधवारी रात्री श्रीरंग सोसायटीतील शिवसेना शाखेजवळ हा वाद पुन्हा उफाळून आला. उस्मानचा मुलगा अनिस (३०) हा अमित यांना मारहाण करण्यास गेला. त्याचवेळी अमित यांच्यावर त्याने चाकूने तीन वार केले. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्ल्यासाठी आलेल्या अनिस याच्यावरही एका गटाने दगडाने हल्ला केला. हा दगड त्याच्या डोक्याला लागल्याने तो यात गंभीर जखमी झाला आहे. त्यालाही उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राबोडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

Web Title: Shiv Sena division chief stabbed in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.