शिवसेनेने टँकर लॉबीला पोसले, ठाणेकर पाण्यावाचून तहानले; आमदार संजय केळकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2022 08:11 PM2022-02-06T20:11:42+5:302022-02-06T20:11:54+5:30
भाजपचे आमदार केळकर गेली दोन दिवस ठाणो शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या दौ:यामध्ये घोडबंदर रोड, वागळे इस्टेट आणि वर्तकनगर आदी भागातील नागरीकांनी त्यांच्याकडे पाणी टंचाईच्या समस्येबाबतचे गाऱ्हाणे मांडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रप्रमाणो ठाणोकरांसाठी पाण्याची व्यवस्था केली नाहीच, उलट सत्ताधारी शिवसेनेने टँकर लॉबीला पोसून ठाणोकरांना पुरेशा पाण्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
भाजपचे आमदार केळकर गेली दोन दिवस ठाणो शहरातील पाणी टंचाईग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या दौ:यामध्ये घोडबंदर रोड, वागळे इस्टेट आणि वर्तकनगर आदी भागातील नागरीकांनी त्यांच्याकडे पाणी टंचाईच्या समस्येबाबतचे गा:हाणो मांडले. याबाबत केळकर यांनी राज्यात आणि महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या संशयास्पद भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यातील पाणी प्रश्न हा शिवसेनेचा जुमला आहे. अत्यावश्यक सेवाही शिवसेना पुरवू शकली नाही. 2017 साली न्यायालयात एका पिटीशन प्रकरणी ठाणो महापालिका अधिका:यांनी प्रतिज्ञापत्न दिले होते. आवश्यक सुविधांसह पाण्याची पुरेशी व्यवस्था केल्यानंतरच बांधकामांना परवानग्या देऊ, असे ठामपा प्रशासनाने त्यात वचन दिले होते. मात्र, तरीही एकीकडे बांधकामांना परवानगी देताना पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याबाबत टाळाटाळ झाली.
पाण्याचे मीटरही सदोष असल्याने पूर्वीपेक्षा अनेकपट जास्त बिले सर्वसामान्य ग्राहकांना मिळत आहेत. पाणीपट्टी भरूनही अनेक गृहसंकुलांतील रहिवाशांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी दर महिन्याला लाखो रूपये खर्च करून खासगी टँकरद्वारे पाणी मिळवावे लागत आहे. लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यायचे की टँकर लॉबीला पोसायचे हा खरा मुद्दा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून शिवसेना ठाणोकरांना क्लस्टर आणि हजारो कोटींच्या योजनांची खोटी स्वप्ने दाखवित आहे. गेल्या काही निवडणूकांमध्ये शिवसेना ठाणोकरांना धरणाचे आश्वासन देत आहे. हे आश्वासन आजूनही शिवसेनेने पूर्ण केलेले नाहीच शिवाय न्यायालयाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रची अंमलबजावणीही केली नाही, याकडेही केळकर यांनी लक्ष वेधले आहे.