शिवसेनेला युतीची आस, भाजपाला स्वबळाचे डोहाळे
By admin | Published: January 11, 2017 07:02 AM2017-01-11T07:02:32+5:302017-01-11T07:02:32+5:30
ठाणे पालिका निवडणुकीत भाजपासोबत युती व्हावी, अशी बहुतांश सर्वसामान्य शिवसैनिकांनी इच्छा आहे. मात्र भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेच्या शीर्षस्थ
अजित मांडके / ठाणे
ठाणे पालिका निवडणुकीत भाजपासोबत युती व्हावी, अशी बहुतांश सर्वसामान्य शिवसैनिकांनी इच्छा आहे. मात्र भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे नाराज असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची हीच वेळ असल्याने तो स्वबळाची भाषा करीत आहे.
ठाण्यात सध्या अनेक कामांचे श्रेय घेण्यावरून मानापमान सुरू असला, तरी अनेक शिवसैनिकांना युती व्हावी, असेच वाटते. ठाण्यातील शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये वाद नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली तर दोन्ही पक्षांना भक्कम बहुमत प्राप्त होईल. ठाण्याच्या राजकारणावर मागील कित्येक वर्षापासून शिवसेनेचा वरचष्मा आहे. गेल्या काही वर्षांत युतीमध्ये लढल्याने भाजपाच्या जागा १४ वरुन आठवर आल्या आहेत. स्वबळावर लढलो तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रथमच संधी मिळेल. मोदी यांचा करिष्मा आणि फडणवीस यांचे खंबीर नेतृत्व असा लाभ घेण्याची संधी असताना जर स्वतंत्र लढून ताकद वाढवली नाही तर ते दुर्दैवी ठरेल, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.