शिवसेना कुणाची मक्तेदारी नाही; केदार दिघेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 10:53 AM2022-08-02T10:53:11+5:302022-08-02T10:54:01+5:30

माझ्यावर दिघेसाहेबांचे संस्कार आहे. पक्षाशी एकनिष्ठ, पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहणं हे महत्त्वाचं आहे असं केदार दिघे यांनी म्हटलं.

Shiv Sena has no one monopoly; Kedar Dighe told Chief Minister Eknath Shinde | शिवसेना कुणाची मक्तेदारी नाही; केदार दिघेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं

शिवसेना कुणाची मक्तेदारी नाही; केदार दिघेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं

googlenewsNext

ठाणे - शिवसेना ही संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही. तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांनी शिवसेना वाढवली. मला जिल्हाप्रमुखपद दिलंय त्यातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचं काम मी करणार आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही अशा शब्दात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावलं आहे. 

जिल्हाप्रमुख केदार दिघे म्हणाले की, जेव्हा शिवसैनिकांची साथ असते तेव्हा कितीही मोठा संघर्ष असला तरी तो सोपा असतो. मला लहान वयात जिल्हाप्रमुख पद मिळालं आहे. माझ्यासारख्या तरूणाला हे पद मिळाल ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही. बाळासाहेबांमुळे आणि आनंद दिघेंमुळे शिवसेना ठाण्यात उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळे ही शिवसेना घडली आहे. कुणाचा फोटो झाकून न झाको शिवसैनिक विचारांवर ठाम आहे. शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच माझ्यावर दिघेसाहेबांचे संस्कार आहे. पक्षाशी एकनिष्ठ, पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहणं हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जायचं आहे. दिघे साहेबांनी घडवलेल्या शिवसेनेत इतकं मोठं पद मिळणं माझ्यासाठी भाग्याचं होतं. मी खूप भावनिक आहे. आत्ता जी परिस्थिती आहे ती संघर्षाची आहे. त्यातून मी संघटना पुढे जाऊन जाणार आहे. खरी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची आहे. विचारांचा वारसा पुढे घेऊन चालले असतील तर शुभेच्छा देतो. त्या विचारांना जागृत होऊन त्यांनी विचार करावा ते काय करून बसलेत. विचारांचा वारसा एकट्यापुरता मर्यादित नाही. हा विचार प्रत्येक कार्यकर्ता जपत आहे असंही जिल्हाप्रमुख केदार दिघेंनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी आनंद दिघे यांच्यासोबत जे काही घडले त्याचा साक्षीदार मी आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यावेळी केदार दिघेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले. केदार दिघे म्हणाले होते की, आनंद दिघेंबाबत जे घडलं ते माहित होतं तर मग इतके वर्ष गप्प का होता? असा सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्र्यांना केला "मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार....मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?" असं केदार दिघेंनी म्हटलं होते. 

Web Title: Shiv Sena has no one monopoly; Kedar Dighe told Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.