शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला नेपाळी बांधवांनी केली मारहाण
By अजित मांडके | Published: September 27, 2022 07:49 PM2022-09-27T19:49:51+5:302022-09-27T19:51:29+5:30
सावंत यांच्या विरोधात नेपाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील इंदिरा नगरमध्ये निषेध व्यक्त केला.
ठाणे - शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेपाळी समाजात रोष निर्माण झाला असून याच्या निषेधार्थ ठाणे शहरात राहणाऱ्या नेपाळी बांधवांनी सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलने मारहाण करून त्यांचा निषेध केला.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काळजीवाहू चंपा सिंग थापा यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. सावंत यांच्या विरोधात नेपाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील इंदिरा नगरमध्ये निषेध व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यवाह चंपासिंग थापा यांची तुलना नोकराशी करून खासदार सावंत यांनी स्वतःची वैयक्तिक स्थिती दाखवून दिली आहे.
यावेळी समाजसेवक महेंद्र सोडारी, शिवसेना उपविभाग प्रमुख कृष्णसिंग सोडारी, शिवसेना शाखाप्रमुख चंदनसिंग, राहुल तिवारी यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार सावंत यांनी थापा यांची तुलना ज्या पातळीवर केली आहे तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे, असे या आंदोलन करत्यांनी म्हटले आहे. थापा यांच्या सारख्या निष्ठावान काळजीवाहू व्यक्तीबद्दल सावंत यांनी जे अपमानास्पद शब्द वापरले आहेत ते निषेधार्ह असल्याचे ही ते म्हणाले.