खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 08:03 PM2021-09-05T20:03:41+5:302021-09-05T20:05:14+5:30

उल्हासनगर सत्ताकारणात स्थानिक साई पक्ष गेल्या तीन महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली.

shiv sena MP shrikant Shinde meets Jeevan Idnani; Shiv Sena-A party together for the Ulhasnagar development | खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र

खासदार शिंदे यांनी घेतली जीवन इदनानींची भेट; उल्हासनगर विकासासाठी सेना-साई पक्ष एकत्र

googlenewsNext

उल्हासनगर- महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यानंतर शहर विकासासाठी शिवसेना-साई पक्ष एकत्र असल्याची प्रतिक्रिया खासदार शिंदे यांनी पत्रकारांना दिली. (shiv sena MP shrikant Shinde meets Jeevan Idnani; Shiv Sena-A party together for the Ulhasnagar development)

उल्हासनगर सत्ताकारणात स्थानिक साई पक्ष गेल्या तीन महापालिका निवडणुकीत किंगमेकरची भूमिका पार पाडत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या साई पक्षाला सोबत घेण्यासाठी शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून रविवारी सायंकाळी ५ वाजता शिंदे यांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरींसह साई पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन, पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांच्या सोबत चर्चा केली. यावेळी दोघांनी शहर विकासासाठी शिवसेना-साई पक्ष एकत्र असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. 

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून साई पक्ष हा शिवसेनेसोबत आल्यास पक्षाची ताकद वाढणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. महापालिकेत यापूर्वी दोन वेळा शिवसेना-साई पक्ष सत्तेसाठी एकत्र आले होते. यावेळी साई पक्षाने लिलाबाई अशान व आशा इदनानी असे दोन महापौर दिल्याची माहिती जीवन इदनानी यांनी दिली. यापुढे दोन्ही पक्ष शहरविकासासाठी एकत्र राहणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेना-साई पक्षाच्या चर्चे वेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नगरसेवक तसेच साई पक्षाकडून जीवन इदनानी, पक्षाचे गटनेते गजानन शेळके, नगरसेवक ज्योती चैनांनी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थिती होते.

खासदारांनी घेतला बेडमिंटनचा आनंद -
शिवसेना-साई पक्षाची चर्चा झाल्यानंतर, खासदार शिंदे यांनी इंदिरा गांधी गार्डनची पाहणी केली. गार्डनच्या बॅडमिंटन कोर्टवर काही तरुण खेळत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही बेडमिंटनचा आनंद घेतला.

 

Web Title: shiv sena MP shrikant Shinde meets Jeevan Idnani; Shiv Sena-A party together for the Ulhasnagar development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.