"फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येण्याची वेळ"

By अजित मांडके | Published: April 4, 2023 05:26 PM2023-04-04T17:26:00+5:302023-04-04T17:26:46+5:30

नरेश म्हस्के यांचा पलटवार, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात, त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टीला तुम्ही कसे पांठीबा देऊ शकता असा सवालही त्यांनी केला.

Shiv Sena Naresh Mhaske's reply to Uddhav Thackeray's criticism | "फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येण्याची वेळ"

"फडणवसींची काडतुसे घुसल्यानेच उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर येण्याची वेळ"

googlenewsNext

ठाणे - राज्याच्या गृहमंत्र्यांना फडतूस बोलणे ही भाषा उद्धव ठाकरे यांच्या तोंडी शोभत नाही. तुम्ही जर आमच्या नेत्यांना अशा भाषेत बोलत असाल तर तुम्हाला याच फडणवीसांची काडतुसे घुसल्याने तुम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आल्याचा टोला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला. त्यामुळे उगाच टिका करु नका, नाही तर ही काडतूसे आणखी कुठे कुठे घुसतील हे समजणार देखील नाही असा इशाराही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे गटाच्या रोशणी शिंदे मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली. त्यावर म्हस्के यांनी पलटवार केला. मुख्यमंत्री हे कोणत्या निकषात तुम्हाला गुंड दिसत आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यातील जनतेची सेवा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार तुम्ही सांगता आम्ही मर्द आहोत, मग महिलेचा आधार कशाला घेता असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पोलीस आयुक्तांना भेटायलाच जायचे होते. तर त्यांची आधी वेळ घेऊन भेटायला जायचे होते असा सल्लाही त्यांनी दिली.

तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात, त्यामुळे अशा चुकीच्या गोष्टीला तुम्ही कसे पांठीबा देऊ शकता असा सवालही त्यांनी केला. राजन विचारे देखील कधी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, आता तर त्यांनी महिलेचा आधार घेतला आहे. तुमच्या हिम्मत असेल तर आमच्या समोर येऊन लढून दाखवा असे आव्हान त्यांनी दिले. तर त्या महिलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झालेली नसून तीची प्रकृत्ती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे काही आरोप केले जात आहेत, ते चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena Naresh Mhaske's reply to Uddhav Thackeray's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.