अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश, भाजपाला जबर झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 12:29 PM2017-12-14T12:29:25+5:302017-12-14T12:30:29+5:30

अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. अंबरनाथ पंचायत समितीवर भगवा फडकला आहे.

Shiv Sena-NCP alliance in Ambernath, Yash for BJP, JB shock | अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश, भाजपाला जबर झटका

अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश, भाजपाला जबर झटका

googlenewsNext

ठाणे - अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. अंबरनाथ पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. आठ पैकी सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने जिंकल्या. शिवसेनेला चार तर राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला.  भाजपाने पंचायत समितीमध्ये खातेही उघडले नाही. 

खरतर राज्यात भाजपा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे. पण अंबरनाथ पंचायत समितीमध्ये भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली. त्याचा त्यांना फायदाही झाले. 

अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. त्यातील दोन जागांवर शिवसेना एका जागेवर भाजपाला विजय मिळाला. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाडी गटातून शिवसेनेच्या सुवर्णा राऊत विजयी झाल्या. 
 

Web Title: Shiv Sena-NCP alliance in Ambernath, Yash for BJP, JB shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.