ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता, जिल्हा परिषद निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 03:25 AM2017-12-15T03:25:15+5:302017-12-15T03:25:15+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत.

Shiv Sena-NCP's power in Thane, Zilla Parishad elections | ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता, जिल्हा परिषद निवडणूक

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता, जिल्हा परिषद निवडणूक

Next

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत.
मागील निवडणुकीवेळी ६६ जागा असलेल्या जिल्हा परिषदेत पालघर जिल्हा निर्मितीमुळे सदस्यसंख्या ५३ झाली आहे. या जिल्हा परिषदेसोबतच भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि अंबरनाथ या पंचायत समित्यांच्या एकूण १०६ जागांची निवडणूकही पार पडली. पाच पंचायत समित्यांपैकी फक्त मुरबाडची भाजपाच्या हाती पडली आहे. उरलेल्या भिवंडी, शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ पंचायत समित्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असेल.
समृद्धी महामार्गासह ठाणे जिल्ह्यातून जाणाºया वेगवेगळ्या प्रकल्पांना ग्रामीण भागातून विरोध आहे. त्यातही शेतजमिनी देण्याविरोधात आंदोलनही झाले होते. त्यामुळे दीड वर्षाने होणाºया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा कौल समजून घेण्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची होती. त्यामुळेच भाजपाने ती प्रतिष्ठेची केली. त्याविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले. त्यांना काँग्रेस, मनसे, कुणबी सेना, रिपब्लिकन पक्ष सेक्युलर यांनी साथ दिली. परिणामी, गावागावानुसार व गटा-गणानुसार लढतीचे स्वरूप बदलले. त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हा प्रश्न होता. पण हे राजकीय समीकरण मतदारांनी स्वीकारल्याचे त्यांनी दिलेल्या कौलातून समोर आले.

पक्षीय बलाबल

ठाणे जिल्हा परिषद
एकूण जागा - ५३
शिवसेना - २६
राष्ट्रवादी - १०
भाजपा - १४
काँग्रेस - १ (बिनविरोध)
अपक्ष - १
एका जागेची मतमोजणी स्थगित

पंचायत
समिती
एकूण जागा - १०६
शिवसेना - ४७
राष्ट्रवादी - १६
भाजपा - ३७
काँग्रेस - २
मनसे - १
रिपब्लिकन पक्ष -१
दोन गणांची मतमोजणी स्थगित

Web Title: Shiv Sena-NCP's power in Thane, Zilla Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे