भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाचे पालिके समोर धरणे आंदोलन

By नितीन पंडित | Published: March 2, 2023 07:30 PM2023-03-02T19:30:30+5:302023-03-02T19:31:49+5:30

मागील वर्षी शिवसेनेने भिवंडी शहरातील नझराणा टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असल्याने काहीतरी दुर्घटना घडण्याच्या आत सदरचा पुतळा नवीन उभारावा म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.

Shiv Sena protest in front of Thackeray group municipality in Bhiwandi | भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाचे पालिके समोर धरणे आंदोलन

भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाचे पालिके समोर धरणे आंदोलन

googlenewsNext

भिवंडी : शहरातील नझराणा टॉकीजजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारुढ पुतळा नादुरुस्त झाल्याने नव्याने पुतळा उभारणीसाठी शासनाने तीन कोटी रुपयांचा निधी भिवंडी पालिकेस दिला असताना तो निधी पालिका प्रशासन कडून गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरीवरी महानगरपालिका मुख्यालया समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात जिल्हा प्रमुख मनोज गगे,उपजिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, शहर सचिव महेंद्र कुंभारे,शहर समन्वयक सुभाष (नाना) झळके,संघटक दिलीप नाईक,उमेश कोंडलेकर,सचिव गोकुळ कदम,दिलीप कोंडलेकर,नितेश दांडेकर,उपशहरप्रमुख विश्वनाथ बुवा नाईक,राकेश मोरे,राम शिगवण आदी सहभागी झाले होते.

मागील वर्षी शिवसेनेने भिवंडी शहरातील नझराणा टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुढ पुतळा जिर्ण झाला असल्याने काहीतरी दुर्घटना घडण्याच्या आत सदरचा पुतळा नवीन उभारावा म्हणुन शिवसेना ठाकरे गटाकडून पाठपुरावा करण्यात आला होता.त्यानंतर शासनाने नव्याने पुतळा उभारण्या साठी तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु पालिकेच्या बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारा मुळे नवीन पुतळा उभारण्यास विलंब झाला आहे.त्यातच नवा अश्वारूढ पुतळा न उभारत तेथे फक्त सुशोभिकरण करण्याचे मनसुबे पालिका प्रशासनाने आहेत.त्यामुळे सुशोभिकरणावर २५ ते ५० लाख रुपये खर्च करुन उर्वरीत निधी गिळंकृत करण्याचा प्रशासनाचा डाव आहे असा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला.

Web Title: Shiv Sena protest in front of Thackeray group municipality in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.