उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाच्या विभागप्रमुखाच्या हत्येची सुपारी, एकाला अटक
By सदानंद नाईक | Published: April 6, 2023 04:18 PM2023-04-06T16:18:39+5:302023-04-06T16:19:46+5:30
शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख सुनील सिंग कलवा यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला.
उल्हासनगर : शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख सुनील सिंग कलवा यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला. उल्हासनगर पोलिसांनी सुनील शर्मा याला अटक केली असून सुपारी देणारा लखी कारी माखिजा फरार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फुलपगारे यांनी दिली.
उल्हासनगर शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख असलेले सुनील सिंग कलवा व माजी नगरसेविकेचे पती लखी कारी माखिजा यांच्यात वाद आहे. दोन महिन्यापूर्वी माखिजा यांच्यावर खंडणीची गुन्हा कलवा यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. दरम्यान उल्हासनगर पोलिसांना बातमीदाराद्वारे शिवसेनेचे विभागप्रमुख सुनील सिंग कलवा यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती मिळाल्यावर, पोलिसांनी सुनील शर्मा याला ताब्यात घेऊन बोलते केले. यावेळी त्याने १० लाखाची खुनाची सुपारी लकी कारी माखिजा यांनी दिल्याची कबुली दिल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पुलपगारे यांनी दिली. लखी कारी माखिजा याचा शोध पोलिसांनी घेतला असता, तो फरार झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख सुनील सिंग कलवा हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांची पाश्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर लखी कारी माखिज वादग्रस्त व्यक्ती महत्त्व आहे. सुनील सिंग कलवा व लखी कारी माखिजा यांच्यात काही वर्षांपासून वाद निर्माण झाला असून दोन महिन्यांपूर्वी माखिजा याच्यावर कलवा यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल झाला. दोघांतील संबंध बघता उल्हासनगर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.