शिवसेनेने हे ‘करून दाखवले’

By admin | Published: January 10, 2017 06:44 AM2017-01-10T06:44:18+5:302017-01-10T06:44:18+5:30

क्लस्टर योजनेला मंजुरी, रस्ते रुंदीकरण, पदपथ-चौकांचे सुशोभीकरण, सौरऊर्जेवरील दिवे, मत्स्यालय अशी काही वचने पूर्ण करण्यात शिवसेनेला यश आले आहे

Shiv Sena showed this by ' | शिवसेनेने हे ‘करून दाखवले’

शिवसेनेने हे ‘करून दाखवले’

Next

ठाणे : क्लस्टर योजनेला मंजुरी, रस्ते रुंदीकरण, पदपथ-चौकांचे सुशोभीकरण, सौरऊर्जेवरील दिवे, मत्स्यालय अशी काही वचने पूर्ण करण्यात शिवसेनेला यश आले आहे.
जमेची बाजू म्हणजे ठाणेकरांसाठी क्लस्टर योजना मंजूर झाली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही होऊ शकलेली नाही. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचे तात्पुरत्या स्वरूपात रेंटलच्या घरांमध्ये स्थलांतर करण्यात येत आहे. या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी दोन चटई निर्देशांक देण्याची मागणी आहे.
शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाची मोहीम सुरू असून काही रस्ते यूटीडब्ल्यूटी पद्धतीने करण्यात आले आहेत, तर काही रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. कॅडबरी, पोखरण १, पोखरण २, स्टेशन परिसर, सर्व्हिस रोड हे रस्ते वाहतूककोंडीतून काही अंशी मोकळे झाले आहेत.
पदपथ आणि चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मागील पाच वर्षांच्या काळात जोमाने झाले असून अनेक महत्त्वाच्या पदपथांना आणि चौकांना आपली खास ओळख मिळाली आहे.
पदपथांवरील दिवे आणि सार्वजनिक ठिकाणची वीजव्यवस्था सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला होता. तो काही अंशी यशस्वी झाला असून पालिकेच्या अनेक कार्यालयांमध्ये सौरऊर्जेचा वापर केला जात आहे. रस्त्यावरील पथदिवे आता एलईडीस्वरूपात लावण्याचे काम सुरू आहे.
ठाण्यात फिरण्यासाठी येणाऱ्यांना अ‍ॅक्वेरियम (मत्सालय) चे कामही आता काही अंशी सुरू झाले असून लवकरच ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
ठाणे शहर वायफाय करण्यासाठी मागील वर्षीच पाऊल उचलण्यात आले. त्यानुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. ठाणे शहर वायफायच्या दिशेने प्रवास करणार आहे.
उत्तम दर्जाची आरोग्यसेवा देऊ शकणाऱ्या खाजगी संस्थांना रुग्णालय उभारण्यास पालिकेचे आरक्षित भूखंड उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, संकार नेत्रालय आणि कॅन्सर रुग्णालयाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आले आहेत.

Web Title: Shiv Sena showed this by '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.