भाजपाचा माज उतरवायला शिवसेना समर्थ

By admin | Published: October 29, 2015 11:29 PM2015-10-29T23:29:01+5:302015-10-29T23:29:01+5:30

शिवसेनेचे बोट धरून आपण इथपर्यंत आलात, याची जाणीव ठेवा, मोठे व्हा, पण माजू नका अन्यथा माज उतरवायला शिवसेना समर्थ आहे

Shiv Sena supremo to take the BJP's light | भाजपाचा माज उतरवायला शिवसेना समर्थ

भाजपाचा माज उतरवायला शिवसेना समर्थ

Next

कल्याण : शिवसेनेचे बोट धरून आपण इथपर्यंत आलात, याची जाणीव ठेवा, मोठे व्हा, पण माजू नका अन्यथा माज उतरवायला शिवसेना समर्थ आहे, असा सज्जड इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या जाहीर सभेत भाजपला दिला.
येथील पश्चिमेकडील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्यांनी ठाकरी भाषेत भाजपसह मनसे आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
२५ ते ३०वर्षांपूर्वी हिंदुत्त्वाला देशपातळीवर महत्त्व नव्हते तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हिंदुत्व देशभर पोहोचविले. आता पाकिस्तानही याची दखल घेत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या पाकिस्तानविरोधी आंदोलनाची खिल्ली उडवल्यावचा समाचार घेताना राष्ट्रवादाचे धडे आम्हाला त्यांनी शिकवू नये असा सल्ला त्यांनी दिला.
पाकडयांना संरक्षण देणे म्हणजे देशभक्ती झाली का? असा सवालही त्यांनी केला. पाकडयांना संरक्षण देणाऱ्या औलादी महाराष्ट्रावर राज्य करीत आहेत ही दुर्देवाची बाब असल्याचे ते म्हणाले. शत्रू ते शत्रू आता मित्रही शत्रू झाले आहेत. निवडणुकीची लढाई ही साधीसुधी नाही. आतापर्यंत अनेक लढाया झाल्या, अगोदर विरोधक होते आता मित्रही अंगावर यायला लागले आहेत, अशा शब्दात त्यानी नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेला गाडायला निघालेल्यांच्या, ७०० पिढ्याही काही करू शकणार नाहीत. एकनाथ खडसे! ही गर्दी येऊन बघा म्हणजे कळेल, असे आव्हान त्यांनी दिले. त्यांच्या बुडाखालच्या खुर्चीला बुडबुडे आल्याने ते बरळत असल्याचेही ठाकरे म्हणाले. आमच्या अंगावर येऊ नका २५ वर्षे तुम्ही दोस्ती पाहिली वाघाचा पंजा पाहिलेला नाही असा इशारा त्यांनी दिला. काही लोक नाशिकची बतावणी करीत मते मागत असल्याचा टोला राज यांना लगावून ते पुढे म्हणाले, होय मी शिवसेनाप्रमुखांच्या नावाने मते मागतोय त्यांच्या नाहीतर काय तुमच्या नावाने मत मागायची? कुत्रं तरी फिरकेल का अशा शब्दात त्यांनी राज यांच्यावर पलटवार केला.

Web Title: Shiv Sena supremo to take the BJP's light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.