भिवंडीत राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
By नितीन पंडित | Published: November 21, 2022 07:19 PM2022-11-21T19:19:15+5:302022-11-21T19:19:51+5:30
बॅनरला जोडे मारत केला राज्यपालांचा निषेध
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या अक्षपार्य वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी सायंकाळी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे घटाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बॅनरला शिवसैनिकांनी जोडे व लाथा मारत आपला राग व निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात भिवंडी पूर्व पश्चिम विधानसभा जिल्हा प्रमुख मनोज गगे, भिवंडी शहरजिल्हा प्रमुख प्रसाद पाटील, शहर सचिव महेंद्र कुंभारे, नाना झळके, दिलीप नाईक, दिलीप कोंडलेकर, युवासेना पूर्व विधानसभा संघटक सुरेंद्र गुळवी, निलेश केंकण, दिलीप नगरकर, गोकुळ कदम, कोमल पाटील, अरुणा पाटील, आशिया शेख, शिल्पा सावरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.