उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाची निर्धार सभा
By सदानंद नाईक | Updated: November 14, 2022 17:36 IST2022-11-14T17:34:49+5:302022-11-14T17:36:46+5:30
उल्हासनगर शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी सार्वजनिक मित्र मंडळ हॉलमध्ये निर्धार सभेचे आयोजन शनिवारी केले.

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाची निर्धार सभा
उल्हासनगर - कॅम्प नं-४ येथील सार्वजनिक मित्र मंडळ हॉलमध्ये शिवसेना ठाकरे गटाने निर्धार सभेचे आयोजन केले होते. सभेला जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यावेळी शिवसैनिकाला मार्गदर्शन केले.
उल्हासनगर शिवसेनेला पूर्वीचे वैभव आणण्यासाठी शिवसेनाउद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी सार्वजनिक मित्र मंडळ हॉलमध्ये निर्धार सभेचे आयोजन शनिवारी केले. यावेळी पक्षाला मजबूत करण्यासाठी चर्चां झाली. यावेळी पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश महाडिक व भीमसेन मोरे उपस्थित होते. त्यांनी गेल्या महिन्यात पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी दिले. गेल्या आठवड्यात स्थानिक शिवसेना नगरसेविका ज्योती माने यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र त्यांचे पुतणे व विभागप्रमुख राजू माने व शरद माने शिवसेनेत असल्याचे बोडारे यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन करून शहरात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला पूर्वीचे वैभव येणार असल्याचे सांगितले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या निर्धार सभेला जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र बोडारे, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्र शाहू, शेखर यादव, संदीप गायकवाड, दिलीप मालवणकर, राजू माने, माजी नगरसेवक भीमसेन मोरे, प्रकाश महाडिक यांच्यासह महिला आघाडी, पदाधिकारी व मोठया प्रमाणात शिवसैनिक उपस्थित