मुख्यमंत्रीपदाची खुर्ची न दिल्यानेच उबाठाने आपली विचारधारा बदलली: मिलिंद देवरा
By अजित मांडके | Published: February 24, 2024 08:38 PM2024-02-24T20:38:45+5:302024-02-24T20:39:19+5:30
एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खूप आव्हानात्मक मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवास आहे.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची न दिल्यानेच त्यांनी आपली विचारधारा बदलली. याला खऱ्या अर्थाने संधीसाधूपणा म्हणतात.अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी ठाण्यातील रेमंड मैदान येथे आयोजित केलेल्या युवासेना राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना केली. दरम्यान, त्यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याने बाळासाहेबांना श्रद्धांजली दिली नाही.असा ही टोला लगावला.
पुढे बोलताना, देवरा यांनी तरुण वर्ग म्हणजे देशाचे भविष्य आहे. तरुण वर्गाकडे खूप वेगवेगळ्या चांगल्या कल्पना आहेत. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जे व्हिजन हवे ते एकनाथ शिंदे यांच्याजवळ आहे. असेही ते म्हणाले. तसेच एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खूप आव्हानात्मक मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवास आहे.
तर, पक्षाचे सोशल मीडिया माध्यम वाढविण्यासाठी तरुण वर्गाला यात हिरिरीने सहभाग घ्यायला हवे.असे म्हटले आहे. राममंदिर उद्घाटनाचे निमंत्रण यांनी नाकारले. हे तेच लोक आहेत, ज्यांनी आस्थेला नाकारले. तर 20 वर्षांपूर्वी मी काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळाचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले पण ते आले नाहीत. त्यांना हिंदू विचारधारा आवडत नाहीत. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असे नेते आहेत ज्यांनी महाराष्ट्रातील हिंदू सणांना, रूढी व परंपरेला प्रोत्साहन दिले. असेही शेवटी त्यांनी सांगितले.