ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:02 PM2023-04-04T12:02:13+5:302023-04-04T12:11:51+5:30

कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार

Shiv Sena Thackeray group's young army officer Roshni Shinde was fatally attacked by a woman from the Shinde group in thane | ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंवर शिंदे गटाच्या महिलांकडून जीवघेणा हल्ला

googlenewsNext

ठाणे :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती सेना पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावर 15 ते 20 महिलांच्या गटाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

कासरवडवली येथील त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडण्याच्या वेळी त्यांच्यावर हा हल्ला शिंदे गटाच्या  महिलांनी कार्यालयात शिरून हा भ्याड हल्ला केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. यासंदर्भात कासरवाडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी  रोशनी शिंदे यांनी तक्रार अर्जही केला आहे. दरम्यान, रोशनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Shiv Sena Thackeray group's young army officer Roshni Shinde was fatally attacked by a woman from the Shinde group in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.