मातेपासून दुरावलेल्या त्या चिमुरडीला शिवसेनेने सांभाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 03:36 PM2020-05-18T15:36:28+5:302020-05-18T15:40:09+5:30
आई, बाबा, आजी, आजोबा या सर्वांनाच कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे १० महिन्यांच्या चिमुरडीचा प्रश्न गहन होता. परंतु वाºयासारखी ही बातमी पसरली आणि शिवसेनेच्या एक ा महिला पदाधिकारीने आता तिची जबाबदारी घेतली आहे.
ठाणे : घरातील आजी, आजोबांना कोरोनाची लागण, त्यात आई आणि वडीलांना देखील कोरोनाची बाधा, आजी, आजीबो आणि वडील मुंबईच्या विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर आईला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात आणण्यात आले आहे. परंतु त्याच आई सोबत तिची १० महिन्यांची चिमरुडी देखील होती. ही माहिती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेच्या मंडळींना समजली आणि रातोरात या चिमुरडीचा ताबा घेत, शिवसैनिकांनी तिला आपल्या ताब्यात घेतले. आता ही मुलगी सुखरुप असून तिच्या दोनही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. तिचा सांभाळ येथील एका खाजगी हॉटेलमध्ये सुरु असून शिवसेनेची एका महिला पदाधिकारीच तिचा सांभाळ करीत आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर यातील आजी आजोबा आणि १० महिन्यांच्या त्या चिमुरडीच्या वडीलांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुंबईत बेड कमी असल्याने त्या चिमुरडीच्या आईला ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिने सोबत आपल्या चिमुरडीलाही घेऊन आली. तिचा सांभाळ करण्यास रुग्णालयातील कोणीच तयार नव्हते. या संदर्भातील माहिती शिरीन अगरवाल यांना ही माहिती समजली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री, तसेच आदीत्य ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांन टीव्ट करुन याची माहिती दिली. त्यानंतर मुंबईतून ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी राहूल लोंढे यांनी याबाबत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती दिली. त्यानंतर कोपरी येथील महिला पदाधिकारी रिना मुदलीयार यांना सोबत घेण्यात आले. मधल्या काळात त्या समाजसेविका अगरवाल यांनी ठाण्यात येऊन मुदलीयार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांची घरी त्या चिमुरडीला नेण्याचे निश्चित झाले. परंतु तरीही धोका संभावू शकतो, असे वाटल्याने अखेर तिला येथील एका खाजगी हॉटेलमध्ये नेण्याचे ठरले. त्यानुसार रविवारी रात्री सर्व सोपास्कार करुन त्या चिमुरडीला आई कडून ताब्यात घेऊन त्या हॉटेलवर आणण्यात आले. तिला खाण्याचे साहित्य, खेळणी, औषधेही शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली. तिच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे आई आणि कॅनडामधील मावशी देखील संपर्कात आहे.
दरम्यान घरातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण होत असतांना त्या चिमुरडीचा पहिला रिपोर्ट हा निगेटीव्ह आला होता. त्यानंतर ती बाधीत असलेल्या आई सोबत असल्याने तिला लागण तर झाली नसेल ना? हे देखील पाहणे महत्वाचे होते. त्यानुसार तिची दुसरी चाचणी करण्यात आली ती देखील निगेटीव्ह आली. त्यानुसार आता तिचा सांभाळ मुदलीयार या करीत आहेत.