कहीं खुशी कहीं गम! भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर 

By नितीन पंडित | Published: October 14, 2022 01:44 PM2022-10-14T13:44:44+5:302022-10-14T13:45:31+5:30

शिवसेनेच्या ठाकरे गटात सध्या कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे.

shiv sena uddhav thackeray group appointments announced in bhiwandi lok sabha constituency | कहीं खुशी कहीं गम! भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर 

कहीं खुशी कहीं गम! भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर 

googlenewsNext

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी: शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यात धन्यता मानल्यानंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक पदावरील नियुक्त्या रिक्त झाल्या असताना गुरुवारी या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली .विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकांनी दावा केला असता त्या पदावर नियुक्ती नसल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली असून काही जण या नियुक्तीमुळे आनंदोत्सव साजरा करत आहेत त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात सध्या कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या भिवंडी लोकसभा सल्लागार पदी कृष्णकांत कोंडलेकर, उपजिल्हाप्रमुख पदी इरफान भुरे,प्रकाश भोईर,तुळशीराम पाटील यांची तर भिवंडी तालुका प्रमुखपदी कुंदन पाटील व भिवंडी ग्रामीण,शहापूर व मुरबाड विधानसभा क्षेत्रासाठी सह संपर्कप्रमुख पदी सोन्या पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून भिवंडी लोकसभा ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाचा प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिल्या पासून दोन महिने हे पद रिक्त आहे.त्याच बरोबर भिवंडी शहर प्रमुख पद सुध्दा रिक्त असताना नियुक्त्या अजूनही जाहीर न केल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

भिवंडी तालुका प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास थळे यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपविली जाते मात्र प्रकृती स्वास्थ्यामुळे ते मोठ्या जबाबदारीसाठी इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. तर अनेकांनी जिल्हाप्रमुख पदासाठी आग्रह धरला असताना त्यांना ते पद मिळाले नाही त्यामुळे ते मिळालेल्या पदावर समाधानी नाहीत अशी परिस्थिती उद्भवली आहे. काही दिवसांपूर्वी संपर्क प्रमुख पदी माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची नियीक्ती करण्यात आली आहे मात्र शहराध्यक्ष पदाचा तिढा सुध्दा अजून सुटलेला नाही.

दरम्यान सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती झालेल्या सोन्या पाटील यांनी आपले सामाजिक कार्य व ठाणे तसेच पालघर परिसरात सुरू असलेले सामाजिक कार्य व जनसंपर्क मोठा असल्याने ते सहसंपर्क प्रमुख पदावर खुश नसून आपली नाराजी त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीररित्या व्यक्त केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shiv sena uddhav thackeray group appointments announced in bhiwandi lok sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.