उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाचे जोडे मारो आंदोलन
By सदानंद नाईक | Published: November 21, 2022 07:10 PM2022-11-21T19:10:04+5:302022-11-21T19:10:41+5:30
भाजपा व शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली
सदानंद नाईक, उल्हासनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी राज्यपाल कोशारी व भाजपचे प्रवक्ताने काढलेल्या अपशब्दच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना ठाकरे गटाने जोडे मारो आंदोलन केले. यावेळी भाजपा व शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा यांच्याबद्दल अपशब्द बोलले. यामुळे महाराष्ट्रात नव्हेतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्याची माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी दिली. शिवसेना शहर शाखे तर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळीं भाजप व शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून आंदोलन वेळी काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
जोडे मारो आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, जिल्हा समन्वयक धनंजय बोडरे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, कैलास तेजी, संदीप गायकवाड आदींसह पदाधिकारी केतन नलावडे, के.डी.तिवारी, सुरेश सोनवणे, राजन वेलकर, भगवान मोहिते, बापू सावंत, राजू माने, विजय सुफाळे, विजय सावंत, विक्रम बोडके, आदेश पाटील, दीपक साळवे, महेंद्र पाटील, प्रकाश माळी, राजू घड्याळी, ज्ञानेश्वर करवंदे, ज्ञानेश्वर मरसाळे, हरी पवार, पप्पू जाधव सुरेखा आव्हाड, जया तेजी, मंगला पाटील, सुनीता गव्हाणे, केसर मोरे, कांता पवार, संगीता भोईर, प्रिया गायकवाड, शशीकंला राजपुत, हेमा कंराडे, मनिषा राजपूत यांच्यासह शेकडो शिवसैनिकासह उपस्थित होते.