'शिवसेना वैद्यकीय कक्ष रुग्णांना भक्कम आधार, गरजूंसाठी लवकरच रिलीफ फंड उभारणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:54 AM2019-04-04T02:54:38+5:302019-04-04T03:03:49+5:30

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरामध्ये एकूण २८ महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते

'Shiv Sena will provide medical support to patients, Raipur fund for needy people' | 'शिवसेना वैद्यकीय कक्ष रुग्णांना भक्कम आधार, गरजूंसाठी लवकरच रिलीफ फंड उभारणार'

'शिवसेना वैद्यकीय कक्ष रुग्णांना भक्कम आधार, गरजूंसाठी लवकरच रिलीफ फंड उभारणार'

Next

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लाभार्थी रुग्णांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी येणाऱ्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे स्वतःचा रिलीफ फंड उभा करणार आहे. त्याचा थेट फायदा गरजू रुग्णांना होईल, असे खा. शिंदे यांनी म्हटले. 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षभरामध्ये एकूण २८ महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतील मदत झालेल्या लाभार्थी रुग्णांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन डोंबिवली येथे करण्यात आले होते.. यावेळी लाभार्थी रुग्ण बांधव तसेच त्यांचे नातेवाईक यांनी मनोगत व्यक्त करत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांना झालेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून निदान झालेल्या हजारो रुग्णांवर मोतीबिंदू, रेटीना, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, कॅन्सर आदी शस्त्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोफत किंवा सवलतीच्या दरात करण्यात आल्या आहेत.याच मेळाव्यात खा. डॉ. श्रीकांत शिंदे येणाऱ्या काळात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष स्वतःचा रिलीफ फंड उभा करणार आहे. याचा फायदा गरजू रुग्णांना होईल असे सांगितले.सदर मेळाव्यात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे, महापौर विनिता राणे, ठा.म.पा. उपमहापौर रमाकांत मढवी, वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,नगरसेवक विश्वनाथ राणे, निलेश शिंदे तसेच महाआरोग्य शिबिरातील सहभागी डॉक्टर्स तसेच लाभार्थी रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचं काम रुग्णांना मोठा आधार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या शिवसेना वैद्यकीय कक्ष सध्या आरोग्य क्षेत्रात प्रचंड चर्चेत आहे. या कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील रुग्णांना थेट मदत पोहोचवण्याचं काम केले जात आहे. मंगेश चिवटे हे शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शस्त्रक्रिया-उपचार होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. तसेच गरजू रुग्ण-संबंधित रुग्णालय आणि विविध ट्रस्ट यांच्यात एक दुवा म्हणून भूमिका पार पाडली जाते.
 

Web Title: 'Shiv Sena will provide medical support to patients, Raipur fund for needy people'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.